मुंबई : कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड आणि रोहा तालुक्यामध्ये १७ गावामधील एकूण १९९४.९६९ हेक्टर क्षेत्रात औषध निर्माण उद्यान (bulk Drug Park) ची स्थापना करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत अधिसूचित करण्यात आले आहे. या ठिकाणी bulk Drug Park विकसित करण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती उद्योग विभागाने दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग शासन निर्णयानुसार रायगड जिल्ह्यात ४० गावांमधील अंदाजे १३४०८.४७३ हे.आर. जमीन एकात्मिक औद्योगिक वसाहतीसाठी सिडकोने अधिसूचित केली आहे. केंद्र शासनाच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या २ जून २०२० च्या अधिसूचनेनुसार औषध निर्माण विभागाने औषध निर्माण उद्याने विकसित करण्याकरिता प्रोत्साहन  देण्यात आले आहे. 



या योजनेनुसार रोहा व मुरूड तालुक्यातील १७ गावामधील एकूण १९९४.९६९ हेक्टर क्षेत्रावर औषध निर्माण उद्यानाची (bulk Drug Park) स्थापना करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळामार्फत सिडको यांना हे क्षेत्र विनाअधिसूचित करण्याबाबत विनंती करण्यात आली. त्यानुसार सिडकोने हे क्षेत्र विनाअधिसूचित केले आहे. त्यामुळे औषध निर्माण उद्यानाचा मार्ग मोकळा झाला आहे.