Maharashtra Government Formation:   नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तिस-यंदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसंच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सहाव्यांदा अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महायुतीचा शपथविधी झाला तरी खातेवाटप झालेले नाही. 24 तास उलटूनही तिघांमध्ये खातेवाटप झालेले नाही. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वाट्याला 7 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या 13 नेत्यांना मंत्रिपदं मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडं सगळी खाती आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे एकही खाते नाही. खातेवाटपावरुन महायुतीत एकमत नाही.  तिघांच्या सरकारचं खातेवाटप कधी  होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


राष्ट्रवादी अजित पवार गटाला सरकारमध्ये 7 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांनकडून मागच्या सरकारमध्ये मंत्रीपद भूषविलेल्या नेत्यांची मंत्रीपदी वर्णी लागणार आहे.   संभाव्य कॅबिनेट मंत्रीपदी  उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अदिती ताटकरे,  संजय बनसोडे, धर्मराम बाबा अत्राम, अनिल पाटील  तर वाईचे मकरंद पाटील यांच्या नावाची देखील चर्चा आहे.  तर राज्यमंत्री पदावर संग्राम जगताप आणि इंद्रनील नाईक, सना मलिक यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, पुणे पालकमंत्रीपदावरून भाजप - राष्ट्रवादी अजित पवार गटात रस्सीखेच सुरु आहे.  पुण्याच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा असताना आता भाजपकडून देखील दावा केला जातोय. पुण्याच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याची माहिती समोर येत आहे.  मात्र आता भाजपकडून मागणी केली जात असल्याने या दोन्ही पक्षात रस्सीखेच पाहायला मिळत आहे.