Maharashtra Government Formation:  महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दहा ते बारा जणांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्वच्छ चारित्र्य आणि धडाकेबाज काम करण्याची तयारी असलेल्या आमदारांनाच प्राधान्य असणार आहे. मंत्रिमंडळात कोण जाऊ शकतं यासाठी शिवसेनेनं पक्षांतर्गत आमदारांचं मूल्यमापन केलं. या मूल्यमापनात काही धक्कादायक माहिती समोर आलीय.


हे देखील वाचा... महाराष्ट्रात तब्बल 92 हजार एकर जमीन यांच्या नावावर? भारतातील तिसरा मोठा जमीनदार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे सरकारमधील 6 मंत्री पास झालेत. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास झालेत. इच्छुकांपैकी 5 आमदार मंत्रिमंडळ समावेशासाठी पात्र ठरलेत सध्या 11 जण मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी तयार  असल्याचं सांगण्यात येतंय. आता मुख्यमंत्री शिवसेनेच्या सर्व मंत्र्‍यांचा शपथविधी एकदाच करतात की दहा जणांचा समावेश करुन दोन ते तीन जणांना वेटिंगवर ठेवतात का याबाबत उत्सुकता आहे. शिवसेनेकडून अकरा जण मंत्रिमंडळ समावेशासाठी उत्सुक आहेत. 


शिंदे सरकारच्या काळात अब्दुल सत्तार यांनी अनेक वाद ओढवून घेतले होते. शिवाय त्यांच्याविरोधात अनेक भ्रष्टाचाराच्याही तक्रारी आहेत. दुसरे नेते संजय राठोड यांचा कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. या दोन्ही नेत्यांच्या नावावर शिवसेनेनंही फुली मारल्यानं त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळणं थोडं अवघड झालंय. आता या अकरा नेत्यांपैकी कुणाला मंत्रिपद मिळणार याबाबतच्या उत्सुकतेवरचा पडदा येत्या काही दिवसांतच हटणार आहे.


मंत्री पदाच्या शर्यतीत असलेले आमदार


१) गुलाबराव पाटील
२) उदय सामंत
३) दादा भूसे
४) शंभूराजे देसाई
५) तानाजी सावंत
६) दिपक केसरकर
७) भरतशेठ गोगावले
८) संजय शिरसाट
९) प्रताप सरनाईक
१०) अर्जून खोतकर
११) विजय शिवतारे