Maharashtra Government Shikshan Sevak: शिंदे सरकारने (Shinde Government) मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) अखेर शिक्षण सेवकांच्या (Shikshan Sevak) मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शिक्षण सेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारकडून जीआर (GR)) प्रसिद्ध करून मानधनात वाढ करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2023 पासून ही वाढ लागू होणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारने प्राथमिक व उच्च प्राथमिकचं मानधन 6 हजार रुपयांवरुन 16 हजार रुपयांवर करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच माध्यमिकच्या शिक्षण सेवकांचं मानधन 8 हजार रुपयांवरुन 18 हजार होणार आहे. याशिवाय उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षकांचं मानधन 9 हजार रुपयांवरुन 20 हजार रूपये वाढवण्यात आलं आहे.  



1 जानेवारी 2023 पासून ही वाढ लागू होणार आहे.  


जीआरमध्ये हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाचा दाखला देण्यात आला आहे. 30 जून 2022 रोजी हा निर्णय देण्यात आला होता. हायकोर्टाच्या आदेशानुसार, मानधनात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचं राज्य सरकारने सांगितलं आहे. तसंच आवश्यक त्या सर्व कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


महाराष्ट्र सरकारच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हा निर्णय उपलब्ध असून त्याचा संगणक संकेताक 202302071326490521 असा आहे.