मुंबई :  Rresident Doctors Good News :निवासी डॉक्टरांना (Rresident Doctors) राज्य सरकारने (Maharashtra government) मोठी भेट दिली आहे. त्यानुसार सरकारकडून 1.21 लाख रुपये देण्यात येणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शासन निर्णय लागू करण्यात आला आहे. कोविड रूग्णांच्या (Corona Patient )  सेवेसाठी सरकारकडून ऋणनिर्देश म्हणून ही रक्कम देण्यात येणार आहे. मार्डच्या आंदोलनानंतर सरकारकडून हा मोठा निर्णय जारी करण्यात आला आहे. (Maharashtra government to provide ₹1.21 lakh to resident doctors)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निर्णयानंतर आता शासकीय आणि महापालिका वैद्यकीय महाविद्यालय, तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व निवासी डॉक्टरांना कोविड काळात त्यांनी बजावलेल्या रुग्णसेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून प्रत्येकाला 1 लाख 21 हजार रुपये देण्यात येतील. या निर्णयाबद्दल सेंट्रल मार्डतर्फे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.


कोविड रूग्णांच्या सेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, पालिकेच्या महाविद्यालयातून निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमधून जीएसटी कपात बंद करावी, अशा विविध मागण्यांसाठी मार्डने संप पुकारला होता. मार्डच्या प्रतिनिधींनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोनच दिवसांत वैद्यकीय शिक्षण विभागाने हा निर्णय जारी केला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांना 1 लाख 21 रूपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला.