मुंबई : तीन राजकीय पक्षांची आघाडी आहे. प्रत्येक विभागात वाटप करायचे आहे. पाच वर्षे हे सरकार चालवायचे आहे. सरकारमध्ये दोन माजी मुख्यमंत्री आहेत. ते आता मार्गदर्शकाच्या भूमिकेतून त्यांचा उपयोग होणार आहे. महाविकासआघाडी असल्याने थोडीशी नाराजी होते, याचा फायदा विरोधक घेतात. आम्ही सर्व एकत्र काम करणार आहोत. त्यामुळे विरोधकांना काही फायदा होणार नाही, असे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणामुळे उशीर झालेला नाही. मंत्रिमंडळ यादी प्रसिद्ध झाली असेल. तीन पक्षाची आघाडी असल्याने विभागच वाटप करायचं आहे. पाच वर्षे सरकार चालवायचे आहे. महाविकासआघाडी असल्याने थोडीशी नाराजी होते याचा फायदा विरोधक फायदा घेतात. आम्ही सर्व एकत्र काम करणार त्यामुळे विरोधकांना काही फायदा होणार नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.


दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यातील वादावर त्यांनी भाष्य केले. असा कोणताही वाद झालेला नाही. अजित पवार यांचा मोठा आवाज आहे. त्यामुळे कुठेतरी बाहेर आवाज आला असले. त्यामुळे गैरसमज झाला असेल, असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले. दोन माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये आहेत आता ते मार्गदर्शक म्हणून त्यांचा उपयोग होणार आहे. मी सर्व बैठकीत होतो. खंडाजगी झालेली नाही. अजित पवारांचा आवाज मोठा आहे. त्यामुळे गैरसमज झाला असेल, असे ते म्हणालेत. दरम्यान, सावकर वादाबाबत ते म्हणालेत मतमतांतरे आहेत.