मुंबई / पुणे : Arogya Vibhag Maharashtra Admit Card: राज्यातील आरोग्य सेवक पदाच्या भरतीसाठी शनिवारी आणि रविवारी लेखी परीक्षा होत आहे.(Health Department Recruitment Exam) या परीक्षेच्या निमित्ताने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. परीक्षेला बसलेल्या एका उमेदवाराला चक्क उत्तर प्रदेशात परीक्षा केंद्र दिले आहे. त्यामुळे त्याला धक्का बसला आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाकडूनही परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र, दुसऱ्या राज्यात परीक्षा केंद्र मिळाल्याने हा काय प्रकार, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. (Maharashtra  Health Department Recruitment Exam Admit Card)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य सेवक पदाच्या भरती परीक्षेसाठी दत्ता पातूरकर हा उमेदवार बसला आहे. या परीक्षार्थीला चक्क उत्तर प्रदेशातील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. त्याच्या प्रवेश पत्रावर नोएडा सेक्टर 55 असं छापून आले आहे. आरोग्य सेवक भरतीतील या गोंधळामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.


दरम्यान, आरोग्य विभागाने परीक्षा प्रवेश पत्र जारी केल्यानंतर आता ऑनलाईन हे प्रवेश पत्र मिळू शकणार आहे. आरोग्य विभाग महाराष्ट्र प्रवेश पत्र 2021 महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ग्रुप सी, ग्रुप डी पदांच्या भरती परीक्षेचे हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केला आहे ते arogya.maharashtra.gov.in वर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करू शकतात.


उमेदवारांनी हे देखील लक्षात घेतले पाहिजे की ते nrhm.maharashtra.gov.in वर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. आरोग्य विभाग महाराष्ट्र 2021 उमेदवारांना प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी काही सोप्या गोष्टींचे पालन करावे लागेल. ते खालीलप्रमाणे आहेत.


Step 1: The candidates will have to login to arogya.maharashtra.gov.in or nrhm.maharashtra.gov.in


Step 2: The candidates will then have to click on the link that says Arogya Vibhag Maharashtra Admit Card 2021


Step 3: A new page will open


Step 4: The candidates will have to enter the required credentials


Step 5: The admit card will be displayed in front of them