मुंबई : शहरासह राज्यात मधल्या काही काळात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत होते. त्यामुळे राज्य सरकारकडून निर्बंध लावण्यात आले होते. मात्र आता कोरोनाचा जोर ओसरला आहे. दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आणि पर्यायांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंधाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. (maharashtra health minister rajesh tope reaction on relaxtation corona restriction at jalna)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजेश टोपे काय म्हणाले? 


"राज्यात आता निर्बंध वाढवण्याऐवजी कमी करण्याकडे राज्य शासनाचा कल आहे", असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. ते जालन्यात बोलत होते.  त्यामुळे मुंबई पाठोपाठ राज्यही लवकरच अनलॉकच्या मार्गावर आहे, असंच टोपे यांच्या प्रतिक्रियेतून संकेत आहेत.



"राज्यातील निर्बंध टप्प्या-टप्प्याने कमी होतील. तसेच कोरोना बाधितांची संख्या मार्च अखेरीस खूप कमी होईल", अशी माहितीही टोपे यांनी दिली. 
   
कोव्हॅक्सीनचा तुटवडा


"राज्यात काही प्रमाणात कोव्हॅक्स लसीची तुटवडा आहे" असल्याची तक्रार टोपे यांनी बोलून दाखवली. कोव्हिशील्डच्या तुलनेत कोव्हॅक्सीनच्या 2 लसींमधील कालावधी हा फार कमी आहे. त्यामुळे नागरिकांचा कल हा कोव्हिशील्ड पेक्षा कोव्हॅक्सीनकडे अधिक आहे. त्यामुळे राज्यात कोव्हॅक्सीन लसीचा तुटवडा असल्याचं म्हंटलं जात आहे.