मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आहे. केंद्र सरकारने २५ मेपासून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण राज्यात विमानसेवेवर मात्र बंदी कायमच आहे. मुंबईतील कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. अशावेळी रेड झोनमध्ये विमानसेवा सुरू करणं आणखी धोक्याच ठरेल. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रीन झोन मधील प्रवाशांना रेड झोन मध्ये आणून संसर्ग/ प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा? व्यस्त विमानतळांना कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सावधगिरीने चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे, त्यामुळे आपोआपच धोका ही वाढेलच! यामुळे राज्यात विमानसेवा अद्याप सुरू होणार नाही, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. (देशात विमानसेवा सुरू होणार असली, तरी राज्यात प्रवासबंदी कायम)



रेड झोन मधील विमानतळ अशा परिस्थिती मध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे.स्वॅब शिवाय प्रवाशांचे नुसतं थर्मल स्कॅनिंग चा काय फायदा? सद्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे शक्य नाही. पॉझिटिव प्रवाशाला रेड झोन मध्ये आणून तेथील धोका वाढविणे हे चुकीचे आहे. यामुळे पुढच्या काही काळात राज्यात विमानसेवा सुरू होणार नसल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. 


विमान प्रवासाबाबत १९ मे रोजी काढलेला आदेशच राज्यात सध्या लागू आहे. या आदेशानुसार राज्यात विमान प्रवासावर बंदी कायम राहणार आहे. देशामध्ये विमानसेवा सुरू होणार असली, तरी महाराष्ट्रात विमान वाहतूक सुरू न करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे राज्य सरकार विमानसेवा सुरू करण्यासाठी उत्सुक नाही