सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक  (Maharashtra HSC SSC exam schedule 2022) जाहीर करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली आहे. बोर्डाकडून यापूर्वी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च 2020 ते 7 एप्रिल 2022 या दरम्यान होणार आहे. तर दहावी बोर्डाची परीक्षा 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होतं.


आता बोर्डाकडून परीक्षेचे प्रत्येक विषयानुसार सविस्तर वेळापत्रक जाहीर केलं आहे. विद्यार्थ्यांना संपूर्ण वेळापत्रक हे बोर्डाच्या www.mahahsscboard.in याअधिकृत वेबसाईटवर पहायला मिळेल.


कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील. 


विद्यार्थ्यांचे आरोग्य,सुरक्षितता प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक, पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.


दहावी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक


दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान होणार


15 मार्च - प्रथम भाषा ( मराठी, हिंदी उर्दू ,गुजराती व इतर प्रथम भाषा)


16 मार्च - द्वितीय वा तृतीय भाषा 


19 मार्च - इंग्रजी 


21 मार्च - हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)


22 मार्च - संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय  (द्वितीय वा तृतीय भाषा)


24 मार्च - गणित भाग - 1


26 मार्च - गणित भाग 2


28 मार्च - विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1


30 मार्च - विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 


1 एप्रिल - सामाजिक शास्त्र पेपर 1


4 एप्रिल ;  सामाजिक शास्त्र पेपर 2


बारावी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक


4 मार्च - इंग्रजी


5 मार्च - हिंदी


7 मार्च - मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू ,पंजाबी ,तामिळ


8 मार्च - संस्कृत