पुणे : Maharashtra Teachers :आता बातमी आहे शिक्षकांसाठी महत्त्वाची. दांडीबहाद्दर शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. दांडी बहाद्दर शिक्षकांची आता खैर नाही. शाळेत न जाताच सरकारचे पाच आकडी पगार घेणाऱ्या दांडीबहाद्दर शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी सरकारने आता कंबर कसली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापुढे प्रत्येक वर्गात त्या वर्गावर शिकविणाऱ्या शिक्षकाचे फोटो लावण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांमध्ये आदराची भावना निर्माण व्हावी या हेतूने ‘आपले गुरूजी’ अभियान राबविण्यात येणार आहे. यामुळे आपल्यासाठी सरकारने कोणते शिक्षक नियुक्त केलेत, याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यातून बोगस शिक्षक कोण हे माहीत व्हावे यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे. यामुळे दांडी बहाद्दर शिक्षकांना चाप लागणार आहे. 
  
सरकारी शाळामंधील अनेक शिक्षक पगार सरकारचा आणि काम मात्र दुसऱ्याचे असे करीत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. ग्रामीण भागात तर जिल्हा परिषद शाळांमधील बहुतांश शिक्षक पुढाऱ्यांच्या मागे फिरताना शाळेकडे फिरकतच नसल्याचे आढळले आहे. काही ठिकाणी तर नाममात्र वेतनावर परस्पर आपल्या जागी एखाद्या व्यक्तीची शिक्षक म्हणून नियुक्ती करीत सरकारडून मात्र गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकांची संख्याही अधिक आहे.


आपले गुरुजी कोण?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच शिक्षण विभागाचा आढावा घेताना प्रामुख्यांने दांडीबहाद्दर शिक्षकांवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांमध्ये आदरभाव वाढावा यासाठी शिक्षकांची छायाचित्रे वर्गात लावावीत, त्यामुळे मुलांनाही आपल्याला शिकविण्यासाठी कोण खरे शिक्षक आहेत, याची माहिती होईल यासाठी ‘आपले शिक्षक’ हे अभियान राबविण्याची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे.