म्युकरमायकोसिस रुग्णांत वाढ, या 5 जिल्ह्यात 234 रुग्ण आढळले
कोरोनाचा राज्यात हाहाकार (outbreak of coronavirus) दिसून येत असताना आता नवीन समस्या पुढे आली आहे. अकोल्यात म्युकरमायकोसिसचे 68 रुग्ण तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
जयेश जगड / अकोला : कोरोनाचा राज्यात हाहाकार (outbreak of coronavirus) दिसून येत असताना आता नवीन समस्या पुढे आली आहे. राज्यात म्युकरमायकोसिस (Mucormycosis) रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अकोला परिमंडळांत म्युकरमायकोसिसचे 234 रुग्ण आढळून आले आहेत.अकोल्यात म्युकरमायकोसिसचे 68 रुग्ण तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनासोबतच आता म्युकरमायकोसिस (Mucormycosis) म्हणजेच काळी बुरशी या आजाराची रुग्णसंख्या वाढते आहे.जानेवारी महिन्यापासून 25 मे पर्यंत अकोला जिल्ह्यात एकूण 68 म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची नोंद झाली आहे तर या आजाराला घाबरुन न जाता वेळेवर उपचार घेण्याचा सल्ला जिल्हा शल्य चिकित्सक तथा अकोला परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक राजकुमार चव्हाण यांनी दिला आहे.
अकोला विभागात म्युकरमायकोसिसचे अमरावती जिल्ह्यात सद्यस्थित सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. तर कोरोना बधितांचा आकडा रोज अधिक असलेल्या वाशिम जिल्ह्यात सध्या म्युकरमायकोसिसचे रुग्ण विभागात सर्वात कमी म्हणजे दोन रुग्ण उपचार घेत आहे.
अकोला परिमंडळ एकूण रुग्ण संख्या
एकूण रुग्ण - 234
आजरातून बरे झालेले रुग्ण - 117
उपचार सुरु असलेले - 104
मृत्यू - 13
जिल्हानिहाय रुग्ण संख्या
अकोला :
एकूण रुग्ण - 68
आजरातून बरे झालेले रुग्ण - 31
उपचार सुरु असलेले - 32
मृत्यू - 5
अमरावती :
एकूण रुग्ण - 108
आजरातून बरे झालेले रुग्ण - 66
उपचार सुरु असलेले - 41
मृत्यू - 1
बुलडाणा :
एकूण रुग्ण - 36
आजरातून बरे झालेले रुग्ण - 15
उपचार सुरु असलेले - 17
मृत्यू - 4
वाशिम :
एकूण रुग्ण - 9
आजरातून बरे झालेले रुग्ण - 5
उपचार सुरु असलेले - 2
मृत्यू - 2
यवतमाळ :
एकूण रुग्ण - 13
आजरातून बरे झालेले रुग्ण - 00
उपचार सुरु असलेले - 12
मृत्यू- 1