Maharashtra Monsoon : हवामानशास्त्र विभागानं गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या वाटचालीबाबतची प्रत्येक लहानमोठी माहिती दिल्याचं पाहायला मिळालं आहे. आता तर, खुद्द हवामान विभागाकडूनच मान्सूनच्या आगमन तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. सध्याच्या घडीला लक्षद्वीप बेट समुह आणि श्रीलंकेतून तो अतिशय वेगानं पुढे सरकत असल्याची माहिती देण्यात आली आहे. ज्या धर्तीवर यंदाच्या वर्षी 4 जून रोजी मान्सून केरळात दाखल होणार असून, त्यानंतर त्याचा महाराष्ट्राच्या दिशेनं प्रवास सुरु होईल आणि राज्यात हा पाहुणा 10 जूनला धडकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


मान्सूनच्या आगमनापूर्वी उन्हाच्या झळा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिथं मान्सूनची वाटचाल सुरु झाली असली तरीही त्याच्या येण्याची वाट पाहण्याचं सत्र अद्यापही सुरु आहे. किंबहुना ही प्रतीक्षा आता अवघ्या काही दिवसांची असली तरीही त्याच उन्हाचा मारा मात्र सर्वांनाच सहन करावा लागणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मोसमी वारे, पाऊस राज्यात दाखल होईपर्यंत विदर्भासह आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 


हेसुद्धा वाचा : Vat Purnima 2023:  आज वडासोबतच करा 'या' दोन वृक्षांची पूजा; अखंड सौभ्याग्यासह मिळवा धनप्राप्तीचा आशीर्वाद 


समुद्रकिनाऱ्यालगत असणाऱ्या मुंबई, कोकण पट्टय़ामध्ये दमट हवामानामुळं उन्हाच्या झळा आणखी तीव्र झाल्याचं भासणार आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली या भागांमध्येही ढगांच्या गडगडाटसह पावसाची हजेरी असेल. तर, अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि सोलापूरमध्येही उकाड्यामुळं नागरिक हैराण होणार आहेत.  


कसा सुरुये मान्सूनचा प्रवास? 


दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मान्सूनचे वारे वेळेच्या आधीच अंदमानात दाखल झाला. ज्यानंतर हे वारे गुरुवारी अरबी समुद्राच्या रोखानं प्रवास करू लागले. पुढच्या एका दिवसातच वाऱ्यांनी आणखी वेग घेतला ज्यामुळं आता अवघ्या काही तासातच मान्सून केरळात दाखल होणार आहे. पुढे 5 जूनला तो कर्नाटक, आंध्रप्रदेशच्या दिशेनं जाईल. मजल दरमजल करत हा मान्सून 10 जूनपर्यं महाराष्ट्रासह तेलंगणात दाखल होणार आहे. 


महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी सकारात्मक चिन्हं असतानाच देशभरातही तत्सम परिस्थिती पाहायला मिळत आहे. येत्या 24 तासांमध्ये हिमालयाचा पश्चिम भाग, पूर्वोत्तर भारत, तामिळनाडू आणि कर्नाटकात पावसाची हजेरी असेल. तर, राजस्थान आणि मध्य प्रदेशातही सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या तुरळक सरी बरसतील.