मुंबई / कोल्हापूर : महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटक वाद (karnataka dispute) पुन्हा एकदा चिघळला आहे. याचे पडसाद कोल्हापूर येथे पाहायला मिळाले. महाराष्ट्राच्या एसटीवर एकाने दगडफेक गेल्याने कर्नाटकला जाणाऱ्या गाड्या रोखण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोल्हापूर येथे मध्यवर्ती बस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्राच्या एसटी बसवर दगडफेक केली. हा प्रकार घडताच उपस्थित लोकांनी दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला चोपले. दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. (Maharashtra-Karnataka dispute, Shiv Sena aggressive )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दगडफेकीनंतर कर्नाटकात जाणारी महाराष्ट्र बस सेवा, तसेच कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी कर्नाटकाची बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर कन्नड रक्षक वेदिके संघटनेने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला. या तणावानंतर वादाची ठिणगी पडली.  



बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर हल्ला चढवला होता. त्याचवेळी त्यांच्या गाडीवरील भगवा झेंडा काढून गाडीची तोडफोड केली. या घटनेनंतर आज पडसाद कोल्हापुरात उमटले. कोल्हापूर एसटी स्थानकावर एका गाडीवर दगडफेक करुन गाडीचे नुकसान करण्यात आली. एसटीच्या काचा फुटल्या. त्यानंतर कर्नाटकला जाणाऱ्या गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. हा प्रकार समजतात शिवसेना कार्यकर्त्यांना आक्रमकपणा धारण केला. शिवसैनिकांनी कोल्हापूर बस स्थानकावर आंदोलन केले. यावेळी त्यांनी कर्नाटक राज्याची बससेवा बंद करत जोरदार घोषणाबाजी केली.