Maharashtra Kesari : महाराष्ट्रातील पैलवानांसाठी महत्त्वाची बातमी, कारवाईबाबत मोठी माहिती समोर!
महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari 2022) स्पर्धा ही मागील काही दिवसांपासून नेमकी कुठे होणार याबाबत संभ्रम होता.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari 2022) स्पर्धा ही मागील काही दिवसांपासून नेमकी कुठे होणार याबाबत संभ्रम होता. तरी या स्पर्धेसाठी खेळणारे पैलवान आणि तालीम यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम पाहायला मिळत आहे. (Maharashtra Kesari 2022 Big information about action against wrestlers latest marathi news)
मल्लांमध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता की कुस्तीगीर संघ आणि तालीम यांच्या निवड चाचणीत खेळणाऱ्या मल्लांवर कारवाई केली जाईल अशी अफवा पसरवली गेली होती. मात्र आत्ता आस्थायी समिती अध्यक्ष संजय कुमार सिंग यांनी या अफवांना पूर्णविराम देत कोणत्याही मल्लांवर कारवाई होणार नाही. मल्लांनी त्यांच्या कुस्ती वर लक्ष द्यावं अस स्पष्ट केलं आहे.
पुण्यातील वारजे येथे आज पुणे शहर आणि पुणे जिल्हा महाराष्ट्र केसरी अधिकृत चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून संजय कुमार हे उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील तब्बल 200 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
दोन दिवसीय या चाचणी स्पर्धेला मोठ्या प्रमाणात मल्ल्यांनी सहभाग घेतला होता. कुस्तीला ज्या एवढ्या मोठ्या उंचीवर नेण्यात आलं आहे. त्याच श्रेय भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यामुळे मिळालं आहे. काही पैलवानांमध्ये तसेच रेफ्रिजमध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता की त्यांच्यावर कारवाई होईल मात्र कुस्ती संघाचे अध्यक्ष हे देशभरातील मल्ल्यांना त्यांच्या नावानिशी ओळखतात. कोणावर अन्याय होऊ देणार नाही मल्ल्यांनी त्यांच्या खेळावर लक्ष द्यावं असं आस्थाई समिती अध्यक्ष संजय सिंग यांनी सांगितलं.