Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन कुठे होणार याची उत्सुकता राज्यभरातील मल्ल आणि कुस्ती शौकिनांना लागली होती. आता ठिकाण ठरलं असून अहमदनगर जिल्ह्यात यंदा महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती समजत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदनगरमध्ये महाराष्ट्र केसरीचे आयोजक आमदार संग्राम जगताप असणार आहेत. डिसेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्र केसरी होण्याची शक्यता आहे. अद्याप तारखा जाहीर झालेल्या नसून लवकरच होणार आहेत. त्यामुळे जीवाचं रान करणाऱ्या मल्लांसाठी आनंदाची बातमी आहे.


गतविजेता कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील गतउपविजेता विशाल बनकर ठरले होते. पृथ्वीराजने गंगावेसचाच सिकंदर शेख, महान भारत केसरी माऊली जमदाडे यांचा पराभव करत 19 वर्षी महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेवर आपलं नाव कोरलं होतं. कुस्तीचं पंढरपूर असणाऱ्या कोल्हापूरकडे कित्येक वर्षांनी केसरी गदा गेली होती. आता मल्लांना कधी एकदा तारीख जाहीर होते याची उत्सुकता लागली आहे.