लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे 30 मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना डॉक्‍टरांनी सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी यासंदर्भात एक पत्र लिहून लवकरच बरा होऊन मी आपणा सर्वांच्या सेवेत येणार आहे आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत असं म्हटलं आहे.


प्रसिद्धीपत्रक केलं जारी
'ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख प्रकृती अस्वस्थाच्या कारणास्तव डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितल्यामुळे दि. २३-५-२०२२ ते दि. ३०-५-२०२२ पर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. इच्छा असूनही कार्यक्रमास येऊ शकत नाही. त्यामुळे कार्यक्रमांच्या संयोजकांची, आयोजकांची गैरसोय होत आहे. त्याबद्दल मनापासून दिलगीर आहोत. 


वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा आपल्या सेवेत पूर्व नियोजित कार्यक्रम पार पडतील. आपल्या सर्वांचे आर्शिवाद पाठीशी आहेत. असेच प्रेम कायम लाभावे ही अपेक्षा. सहकार्याबद्दल धन्यवाद,” असे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात म्हटलं आहे.