मुंबई : 15 मेपर्यंत राज्यातील लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) कायम राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली. कोरोना रूग्णांची संख्या (Corona Patient) स्थिर असली तरी कमी होत नसल्यानं लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन कालावधी वाढवण्यावर शिक्कामोर्तब झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सध्या दोनच लसी उपलब्ध आहेत, 10 लाख लस देण्याचे कोवक्सींने मान्य केलं आहे. एक कोटी लस देण्याचे कोविडशिल्डने तोंडी मान्य केलं आहे. दर महिन्याला 2 कोटी लस द्यावे लागतील , तेवढी क्षमता राज्याची आहे, 12 लाख डोस दररोज देता येईल अशी क्षमता असल्याचे ते म्हणाले.


अपुऱ्या पुरवठ्यामुळे 1 मे ला लसीकरण सुरू होणार नसल्याचे टोपे म्हणाले. 



18 ते 45 वयोगटातील लोकांसाठी लसीकरणासाठी वेगळे केंद्र असणार आहेत. केवळ सरकारी आणि पालिकेच्या लसीकरण केंद्रावरच मिळणार मोफत लस मिळतील. खासगी रूग्णालयांमध्ये मात्र लस घेण्यासाठी पैसे मोजावे लागणार असल्याचे ते म्हणाले.


मोफत लस 


सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळेच 18 ते 45 च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल असेही ते म्हणाले. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.