Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: महाविकास आघाडीने राज्यात मोठी मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडी 28 जागांवर आघाडीवर आहे. तर महायुती 20 जागांवर आघाडीवर आहे. ठाकरे गट 11 जागांवरील आघाडीसहीत दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरतोय तर भाजपा सध्या 13 जागांसहीत सर्वात मोठा पक्ष ठरत असल्याचं चित्र दिसत आहे. शिंदे गट 6 जागांवर आघाडीवर आहे तर शरद पवार गटाने 5 जागांवर आघाडी मिळवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दरम्यान लोसकभा निवडणुकीतील 543 कलांपैकी 290 जागांवर एनडीएला आघाडी असून, 225 जागांवर इंडिया आघाडीला सरशी मिळाल्याचं दिसत आहे. इतर पक्षांना 28 जागांवर आघाडी मिळाली असून नुकतीच ही आकडेवारी समोर आली आहे. दुसरीकडे  निवडणूक निकालांची आकडेवारी जाहीर होत असतानाच शेअर बाजारातून सर्वाच मोठी बातमी समोर आली. निकालांचे कल हाती आले त्या क्षणी सेन्सेक्स 3000 अंकांनी कोसळला असून, निफ्टी 900 अंकानीं कोसळला आहे.