Maharashtra LokSabha Election: महाराष्ट्रात मतदान कधी? किती टप्प्यात होणार निवडणूक? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
Maharashtra Lok Sabha Elections 2024 Full Schedule: गेल्या अनेक महिन्यांपासून देशाला प्रतिक्षा लागलेल्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं आहे. सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिला टप्पा 19 एप्रिलपासून सुरु होणार आहे. तसंच 4 मे रोजी देशात मतमोजणी होईल
Maharashtra Lok Sabha Elections 2024 Full Schedule: गेल्या अनेक महिन्यांपासून देशाला प्रतिक्षा लागलेल्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिला टप्पा 19 एप्रिलपासून सुरु होणार आहे. तसंच 4 मे रोजी देशात मतमोजणी होईल. दरम्यान महाराष्ट्रात निवडणुकीचा कार्यक्रम नेमका कसा असणार आहे हे जाणून घ्या.
महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात 19, 26 एप्रिल तसंच 7, 13 आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. तसंच 26 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.
महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुक
पहिला टप्पा –
रामटेक, नागपूर, भंडारा, गरचिरोली, चंद्रपूर
मतदान तारीख – 19 एप्रिल
दुसरा टप्पा –
बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी
मतदान तारीख – 26 एप्रिल
तिसरा टप्पा –
रायगड, बारामती, उस्मानबाद, लातूर, सोलापर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, हातकणंगले
मतदान तारीख – 7 मे
चौथा टप्पा –
नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
मतदान तारीख – 13 मे
पाचवा टप्पा –
धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, (मुंबईतल्या 6 जागा)
मतदान तारीख – 20 मे
देशासह महाराष्ट्रात 2019 च्या तुलनेत वेगळी स्थिती
मागील म्हणजेच 2019 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी देशात राजकीय स्थिती पूर्णपणे वेगळी आहे. महायुती, महाआघाडी यांचं गणित वेगळं दिसत आहे. मागील निवडणुकीत जे पक्ष विरोधी गटात होते ते आता एनडीएत सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रात तर फारच वेगळं चित्र आहे. शिवसेनेत दोन गट पडले असून एकनाथ शिंदेंनी भाजपाशी हातमिळवणी केली आहे. तर राष्ट्रवादीमधून अजित पवार गट बाहेर पडला असून तोही भाजपासोबत आहेत. विशेष म्हणजे शिंदे आणि अजित पवार गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे निवडणुकीत मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
कोणत्या पक्षाची किती ताकद?
भाजपा - 290
काँग्रेस- 48
डीएमके- 24
टीएमसी- 22
वायएसआर काँग्रेस- 22
जेडीयू- 16
शिवसेना (शिंदे गट )- 13
बीजेडी- 12
बसपा- 10
बीआरएस - 8