महाराष्ट्रातील पहिले थंड हवेचे ठिकाण तुम्हाला माहितीये का?, निसर्गसौंदर्य भूरळ पाडणारे
Hill Stations In Maharashtra: महाराष्ट्रात अनेक थंड हवेचे ठिकाणे आहेत. पण तुम्हाला माहितीये का महाराष्ट्रातील पहिले थंड हवेचे ठिकाण कोणते आहे.
Maharashtra Tourism: महाराष्ट्राला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. पर्यटनातही महाराष्ट्र अग्रेसर आहे. महाराष्ट्राला सुंदर समुद्र किनारा तर लाभला आहेच पण त्याचबरोबर दरी-खोऱ्यातला महाराष्ट्रही खूप सुरेख आहे. कणखर आणि रांगणा महाराष्ट्र पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यचक भेट देतात. हिवाळ्यात राज्यातील काही थंड हवेची ठिकाणे तर गर्दीने तुडूंब भरलेली असतात. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील पहिले थंड हवेचे ठिकाण सांगणार आहोत.
महाराष्ट्रात थंड हवेची अनेक ठिकाणे आहेत. शांत आणि निसर्गरम्य ठिकाणांना तुम्ही कधीही भेट देवू शकता. येथे मिळणारी शांतता आणि निवांतपणा तुम्हाला अनुभवता येऊ शकतो. असंच एक ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. त्याला महाराष्ट्राचं नंदनवन असंही म्हणतात.
महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेले आहे. समुद्रसपाटीपासून 4500 फुट उंचीवर वसलेले आहे. ब्रिटिशांच्या काळात या भागाला मुंबईची उन्हाळ्यातील राजधानी असंही म्हटलं जात होतं. या भागात ब्रिटीश कालीन वास्तु व इमारती आजही ब्रिटीश राजवटींची ओळख करुन देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरला उत्कृष्ट गिरिस्थान म्हणून ओळख मिळाली आहे. निसर्गरम्य आणि नयनरम्य असं हे ठिकाण आहे. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणूनही महाबळेश्वर ओळखले जाते.
गर्द झाडी, जंगल, डोंगर, दऱ्या याबरोबरच स्ट्रोबेरीच्या शेतीसाठीही महाबळेश्वर ओळखले जाते. महाबळेश्वरचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे येथील प्राचीन आणि सुंदर मंदिरे. कृष्णाबाई मंदिर,पंचगंगा मंदिर, महाबळेश्वर मंदिर या मंदिरांच्या पौराणिक महत्त्वांमुळं ते पर्यटकांचे खास आकर्षण आहेत.
महाबळेश्वरमध्ये काय फिराल?
महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी खूप सारी ठिकाणे आहेत. येथून सूर्यास्त आणि सूर्योदय पाहणे म्हणजे हे दृष्यच अंगावर रोमांच फुलवणारे असते. आर्थर सीट पॉइंट, ईको पॉइंट, टायगर स्प्रिंग, एलफंट पॉइंट, वेण्णा लेक, फॉकलंड पाँइट, लिंगमळा वॉटर फॉल, सनसेट पॉइंट.
महाबळेश्वरला भेट देण्याचा योग्य वेळ
महाबळेश्वरला तुम्ही वर्षभरातून कधीही भेट देता येऊ शकते. पण तर डिसेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी उत्तम आहे. पावसाळ्यात या भागात पावसाचे प्रमाण खूप असते. येथील निसर्गसौंदर्यही भूरळ घालत असते.
महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी, रासबेरी, जांभळाचा मध व लाल मुळे, गाजरे प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळते.
कसं जाल?
महाबळेश्वरला जाण्यासाठी तुम्ही बस, ट्रेन किंवा विमान या तिन्ही पर्यायांचा वापर करु शकता.