सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : आरोग्य विभाग भरती परीक्षाच्या पेपर फुटीचं प्रकरण ताजं असतानाच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षेतील (Mhada Exam) गैरप्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने हा गैरप्रकार उघडकीस आणला असून या प्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा पद्धतीने फुटला म्हाडाचा पेपर
'म्हाडा' पेपर मिळवण्यासाठी (Paper Leak) कोडवर्डचा वापर केल्याची माहिती पुढे आली आहे. आरोपींना काही कोडवर्ड तयार केले होते. एकमेकांशी संभाषण साधताना आरोपी या कोडवर्डचा वापर करत होते. आरोपींच्या तपासात ही माहिती समोर आली आहे. यातला प्रमुख कोडवर्ड होता, ‘घरातली वस्तू कधी मिळणार’.


कोडवर्डचा अर्थ काय होता
आरोपींना फोनवरून 'घरातली वस्तू कधी मिळणार' कोडवर्डच्या माध्यमातून म्हाडाचे पेपर मागण्यात आलेत होते, या कोडवर्डचा अर्थ असा आहे. 
घर म्हणजे म्हाडा 
वस्तू म्हणजे पेपर, 
घरातली वस्तू कधी मिळणार’ असा होता कोर्डवर्ड 


म्हाडाच्या पेपरचं काय, असे विचारल्यास संशय येईल, म्हणून आरोपींनी हा कोडवर्ड वापरल्याचे तपासात पुढे आले आहे, प्रश्‍नपत्रिका मिळण्यासाठी अनेक उमेदवार आरोपींशी सातत्याने फोनवरून संपर्कात होते. 
आरोपींना पकडल्यानंतर आता त्यांना फोन करणाऱ्या विद्यार्थ्यांची ही पोलिसांकडून चौकशी होऊ शकते. 


म्हाडा पेपर फुटीची मोडस ऑपरेंडी  झी 24 तासच्या  हाती लागली आहे . म्हाडा परिक्षेच्या वेळी आरोपींनी प्लॅन बी चीही केली तयारी केली होती 


म्हाडा परिक्षेसाठी आरोपींचा प्लान बी काय?
पेपर फोडता आला नाही तर परीक्षेनंतर ज्या विद्यार्थ्यांबरोबर व्यवहार झाला होता त्यांचे गुण वाढवून देण्याचा प्लॅन आखला होता असी माहिती मिळते आहे . पण पोलिसांनी पेपर फोडण्याच्या आधीच आरोपींना पकडल्यामुळे या प्रकरणाचा भांडाफोड झाला.  आरोपींना ताब्यात घेतले तेव्हा डिजिटल रेकॉर्ड मध्ये म्हाडा परीक्षेच्या सॉफ्ट कॉपी तयार  होत्या.


कोट्यवधीची उलाढाल
आरोग्य विभागाच्या गट ‘क’ आणि ‘ड’ गटांची भरती परीक्षा आणि म्हाडाच्या चार प्रवर्गांतील परीक्षांचे पेपर फोडण्यासाठी कोट्यवधींची उलाढाल झाल्याचं पुणे सायबर पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. 
सायबर पोलिसांची पथके राज्यातील विविध जिल्ह्यात, शहरांमध्ये पाठवण्यात आली आहेत. या परीक्षेमध्ये बारा ते पंधरा लाख रुपये घेतले जाणार होते तर म्हाडाच्या परीक्षेमध्ये 30 ते 35 लाख रुपये घेतले जाण्याची शक्यता पोलिस आयुक्तांनी वर्तवलीय, याशिवाय इतर परिक्षात ही असाच प्रकार झाल्याचा संशय पोलिसांना आहे त्या दृष्टीने तपास आता वेगाने सुरु झाला आहे.