विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी एका अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दिव्यांगांना वाटप करण्यात आलेल्या इ-रिक्षा (E-Rickshaw) खराब असल्याच्या तक्रारी आल्यानंतर बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची कानउघडली केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती संभाजी नगरमध्ये (Chatrapati Sambhaji Nagar राज्य सरकारच्या योजनेतून दिव्यांगांना इ-रिक्षावाटप करण्यात आल्या होत्या. मात्र त्या इ-रिक्षा खराब होत्या अशी तक्रार दिव्यांगांनी बच्चू कडू यांच्याकडे केली. त्यामुळे बच्चू कडू यांनी संबंधित अधिकारी आणि कंपनीचे कर्मचारी रिक्षा पाहण्यासाठी बोलावले होतं. मात्र कंपनीने माहिती नसलेल्या एक कर्मचारी पाठवला. त्यामुळे बच्चू कडू चांगलेच त्याच्यावर संतापले आणि त्याच्या कानाशिलात लगावली,  जर तुला काही माहितीच नाही तर इथे आला कशाला असा सवाल बच्चू कडू यांनी त्याला केला आणि या वेळेस उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांनाही त्यांनी झापलं. योजनेतून जवळपास 500 रिक्षांचे वाटप करण्यात आलंय, पैकी 250 ते 300 रिक्षा या खराब असल्याचं बच्चू कडू यांचे म्हणणं आहे,  कानाशिलात लगावलेला अधिकारी नाही तर कंपनीचा कर्मचारी होता असे कडू म्हणाले, या सगळ्या नादुरुस्त रिक्षा  परत घ्याव्यात असे कडू यांनी सांगितलं. दरम्यान राज्य सरकार याबाबत चौकशी करेल असं आश्वासन दिव्यांग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे.


बच्चू कडू यांच्या मोर्चाला परवानगी नाही
दरम्यान, बच्चू कडू यांचा शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये महामोर्चा आहे.  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर,  बेरोजगारीच्या प्रश्नावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र पोलिसांनी अजूनही या मोर्चाला परवानगी दिली नसल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. जर पोलिसांनी परवानगी दिली नाही तर आम्ही प्रहार स्टाईलने मोर्चा काढू असा इशारा त्यांनी संभाजीनगर पोलिसांना दिला आहे.  त्यांनी आम्हाला थांबवू नये अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने काम  करू,सरकार आमची अडवणूक करेल असे वाटत नाही त्यांनी असे केले तर त्यांना महागात पडेल असंही बच्चू कडू म्हणाले. 


शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत आणि लाडकी बहिणीला 1500, कष्टकरी लोकांना पैसे मिळायला हवे, पैसे नसेल तर राज्यपाल बंगला विका त्यातून पैसे मिळेल असा टोलाही बच्चू कडू यांनी सरकारला लगावला. आमच्या 18 मागण्या सरकारकडे मांडू, सरकारने मागण्या पूर्ण केल्या तर माझा मतदार संघ महायुतीला पाठिंबा देईल. आम्ही निवडणूक लढणार नाही, पण नाही केल्या पूर्ण तर  प्रहार आहेच, आम्ही एकटे काफी आहोत, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिलाय.