Devendra Fadanvis On Lakhpati Didi: महाराष्ट्रात 1 कोटींहून अधिक लखपती दीदी बनवणार तसेच 10 लाख मुलांना रोजगार देणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. धुळे येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र सरकारकडून पहिल्या टप्यात 25 लाख लाखपती दीदी बनवणार तर  पुढे एक कोटीपेक्षा अधिक लखपती तयार करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच 10 लाख मुलांना रोजगार देणार आहोत, असे ते म्हणाले.  गुजरातला जाणारे पाणी महाराष्ट्रात अडवले जाणार असल्याचे नियोजन त्यांनी यावेळी सांगितले.


गुजरातला जाणारे पाणी महाराष्ट्रात अडवले जाणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात मोदी सरकार आणि राज्यातील युती सरकार जिल्ह्याचा दुष्काळाचा डाग पुसून टाकण्याचे कामं करीत आहोत.14 वर्ष राज्यात आघाडी सरकार होते, या काळात 26 कोटी रुपये दिले गेले.महाराष्ट्राला  बळीराजा योजनेत 30 हजार कोटी मिळाले.2407 कोटी जामफळ प्रकल्पला दिले. 54 गावाचे सिंचन होणार आहे तर 42 हजार हैक्टर जमीन बागात हीणार असल्याचे ते म्हणाले. 


9.24 TMC पाणी अडवून शेतात पाणी दिले जाणार आहे. आमच्या सरकारने विजेचे बिल माफ केले आहे. त्यामुळे आता कोणालाच बिल भरावे लागणार नाही.  शेतकऱ्यांना 12 हजार मेगा व्हॅट वीज हरित वीज तयार करण्याचे नियोजन आहे.येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार असल्याचे ते म्हणाले.


आता आपण 5330 कोटी सुधारित मान्यता प्रकल्पला दिली आहे, त्यामुळे सुलवाडे जामफळ योजनेला निधी कमी पडणार नाही..अक्कलपाडा प्रकल्प 100 % भरण्यासाठी योजना तयार केली आहे.उत्तर महाराष्ट्रातील नार पार गिराणा प्रकल्पातील 10 tmc पाणी अडवून महाराष्ट्रात थांबवालं जाणार आहे. गुजरातला जाणारे पाणी महाराष्ट्रात अडवले जाणार असल्याचे ते म्हणाले. 


 


कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार बोनस देणार असल्याचे ते म्हणाले. 


धुळ्याचे चित्र बदलणार


धुळ्याचे चित्र बदले जाणार आहे. येणाऱ्या काळात धुळे जिल्ह्यात औद्योगिक क्रांती होणार आहे.आघाडी सकाराच्या काळात मनमाड इंदोर प्रकल्पला निधी देण्यास नकार दिला. युती शासन आल्याबरोबर निधीसाठी केंद्राला पत्र दिले. येत्या 5 वर्षात धुळे जिल्ह्याचा कायापालट होणार असल्याचे ते म्हणाले. 


सरकार आल्यावर निधी वाढवणार


महाविकास आघाडीच्या पोटात दुखतय. म्हणून ते लाडकी बहीण योजने विरोधात कोर्टात गेले. पण काळजी करू नका, योजना बंद करू देणार नाहीत.1500 रुपयात काय होतं? असं म्हणतात पण ज्यांना मित्र आहेत त्यांना त्याच महत्व आहे. आघाडीची देण्याची नियत नाही, साकार आल्यानंतर पुनः निधी वाढवणार असल्याची घोषणा त्यांनी केले.