मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra corona cases) कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याची चिन्हं असतानाच नव्या कोरोनाबाधितांचा आकडा चिंता वाढवत आहे. शनिवारी राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहिनुसार शनिवारी राज्यात 6959 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, 7467 रुग्णांनी या विषाणूच्या संसर्गावर मात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या कोरोना रुग्णांपेक्षा राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जास्त आहे. असं असलं तरीही हा आकडा मोठ्या फरकानं कमी करण्याचं आव्हान सध्या राज्यातील आरोग्य विभागासमोर आहे. सध्याच्या घडीला राज्यात एकूण 60,90,786 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. परिणामी राज्याचा रिकव्हरी रेट 96.62 टक्क्यांवर पोहोचला आहे. 


Coronavirus : 3 पैकी एका रुग्णाचा मृत्यू, कोरोनाचा 'सुपर म्युटंट' माजवणार हाहाकार


 


आरोग्य विभागाच्या माहितीनुसार शनिवारी राज्यात 225 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. ज्यामुळं मृत्यूदर हा 2.1 टक्क्यांवर गेला आहे. सध्या राज्यातील कोरोना संसर्गाचं प्रमाण पाहता, 476609 जण गृह विलगीकरणात असून, 3166 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. 




मागील चोवीस तासांतील मुंबईची आकडेवारी 
मुंबईतील (Mumbai) कोरोना संसर्ग बऱ्याच अंशी नियंत्रणात आल्याचं चित्र आहे. शनिवारी शहरात 346 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, 444 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मागील 24 तासांत शहरात 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचीही नोंद करण्यात आली आहे. मुंबईत आता 4972 सक्रिय कोरोना रुग्ण असून, आतापर्यंत 711517 रुग्णांनी या विषाणूशी यशस्वी झुंज दिली आहे.