औरंगाबाद : मनसेप्रमुख राज ठाकरे (Mns Chief Raj Thackeray) औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे पत्रकारांशी विविध मुद्द्द्यांवर संवाद साधतायेत. राज्यातील सत्तेस्थापनेपासून महाविकास आघाडीचं सरकार पडेल, अशी चर्चा दररोज पाहायला मिळते. या मुद्द्यावरुन आणि इतर अन्य मुद्यांयवरुन मनसेप्रमुखांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra navnirman chief raj thackeray reaction over to Probability on mahavikas aaghadi collapsed at aurangabad marathwada) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे काय म्हणाले? 


"राज्यात 3 पक्षांचं सरकार पाहता, ते पडेल असं वाटत नाही. तसेच मी महाविकास आघाडीचे घोटाळे बाहेर काढणार नाही", असंही त्यांनी स्पष्ट केलं. 



राज्यातील 3 पक्षांच्या महाविकास आघाडीला नुकतीच 2 वर्ष पूर्ण झाली. मात्र हे 3 पक्षांचं सरकार फार काळ टिकणार नाही. तसेच हे सरकार लवकरच पडेल, असं भाकित अनेकदा करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हे सरकार मार्चमध्ये पडेल, अशी भविष्यवाणी केली होती.


या सर्व चर्चेवर राज ठाकरेंना महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.   


पेपर फुटीवरुन काय म्हणाले? 


"राज्यात पेपर फुटण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा पेपर फुटले आहेत.


"पेपर फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही. सरकार म्हणून वचक नाही. तसेच पेपर फोडणारे फुटत नाहीत", अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. 


राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभाग, म्हाडा यासारख्या विविध परीक्षांचे पेपर फुटले. यामुळे परीक्षार्थींमध्ये संतापाचं वातावरण होतं.