पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या डॅशिंग नेत्या आणि माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील (rupali patil thombre)  यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा अनिल शिदोरे यांच्याकडे सुपूर्त केला आहे. (maharashtra navnirman sena leader and former corporator rupali patil thombre Resigned to mns all post before raj thackeray pune tour)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुपाली ठोंबरे पाटील या लवकरच कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहेत, याबाबतची भूमिका त्या लवकरच स्पष्ट करणार आहेत. दरम्यान त्यांनी याबाबतची माहिती दिली नसली, तरी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 



रुपाली ठोंबरे पाटील या पुण्यातील मनसेच्या धडाडीच्या आणि आक्रमक अशा नेत्या होत्या. मात्र त्यांनी आता राजीनामा दिल्याने मनसेला महापालिका निवडणुतकीच्या तोंडावर जबर धक्का बसला आहे. 


कोण आहेत रुपाली ठोंबरे पाटील?


रुपाली ठोंबरे पाटील या पुणे महानगरपालिकेतील मनसेच्या माजी नगरसेविका होत्या. तसेच त्या झाशीची राणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत. गेल्या काही वर्षात त्यांनी मनसेसाठी पुण्यात मोठं काम केलं होतं. 


मनसेप्रमुखांचा पुणे दौरा


दरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे हे पुढील दोन दिवस पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर असणार आहेत.