Shiv Sena Reaction On Maharashtra CM Post: महायुती सरकारकडून 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाईल. एकनाथ शिंदे यांच्याकडेच पुन्हा मुख्यमंत्रीपद जाणार असे म्हटले जात असताना देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे आले आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. यावर शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी परवावर येऊन ठेपला आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजपचे संकटमोचक गिरीष महाजन यांच्या एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. काल गिरीष महाजन ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी गेले होते. त्यानंतर आज पुन्हा गिरीश महाजन वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी पोहोचले. यावेळी एकनाथ शिंदे, गिरीष महाजन आणि उदय सामंत यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. तिघांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ऍंटी चेंबरमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. संभाव्य खाते वाटपावर त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. 


मुख्यमंत्रीपदामुळे नाराजी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महायुतीमध्ये कुठेही नाराजी नाही. मुख्यमंत्र्यांची तब्येत ठिक नव्हती म्हणून ते गावी होते आणि आज ते रुग्णालयात गेले. पण नाराज असल्याच्या चर्चा झाल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावस्कर म्हणाले.  महायुतीसाठी महाराष्ट्राच्या जनतेने भरभरुन मतदान केलं. येणारा कार्यक्रमदेखील महान होणार आहे. कोणत्याही मागण्यांसाठी काही अडलं नव्हतं. महाजन यांच्यानंतर फडणवीस भेटले. ज्या मंत्र्यांचे चारित्र्य चांगले, भ्रष्टाचारी नाहीत अशांनाच मंत्रिपद मिळेलं. अभ्यासू आणि काम करणारे मंत्री दिले जातील, असे पावसरकर म्हणाले.


'शिंदे यांची लोकप्रियता शिखरावर'


प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना वाटतं आपल्या अनुभवी मंत्र्यांना स्थान मिळावं. याचं मोजमाप दिल्लीतील पक्षश्रेष्ठी करणार. यासाठी मंत्र्यांची प्रगतीपुस्तक मागवली आहेत. राजकारणामध्ये नंबर चालतात. ज्यांचे जास्त नंबर असतात, त्यांचा मुख्यमंत्री होतो. आमच्याकडे 132 आमदार आले मग आमचा मुख्यमंत्री असावा, असे भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटते. खातं कुठचही द्या मी कॉमन मॅन म्हणून लोकांसाठी उभा राहिनं, हे मुख्यमंत्र्यांना वाटतं. शिंदे यांची लोकप्रियता शिखरावर गेली. समोरच्याने किती आरोप केले तरी मी कामातून उत्तर दिले. माझ्या नेत्यांना कोणतं खातं मिळत हे महत्वाचं नाही. मी कामातून उत्तर देईन, असे शिेदे नेहमी सांगतात, असेही ते म्हणाले. 


'काही खाती बदलतील'


नियमानुसार भाजपचा गटनेता निवडला जाईल, यानंतर खाती कोणती मिळणार हे ठरेल. महत्वाची खात्यांसाठी आम्ही अडून बसलेलं नाही. मोदी-शहा हे निर्णय घेत असतील तर आम्हाला मान्य आहे. केंद्र सरकार हे महाराष्ट्रासाठी काहीही करायला तयार आहेत. मग अशांसाठी अडून आणि नडून कशासाठी राहायचं? असे पावसकर म्हणाले. खातेवाटपात कुठेही घोडं अडलेलं नाही. ज्यांची संख्या जास्त त्यांचा मुख्यमंत्री होणार हे नैसर्गिक आहे. दरम्यान काही खाती बदलतील असे संकेत आहेत. महायुती हे कुटुंब आहे. केंद्रानं महाराष्ट्राला सढळ हस्ताने मदत केली. महायुतीचा उद्देश एक आहे, असे ते यावेळी म्हणाले.