नाशिक : Omicron Coronavirus : राज्यात रूग्णसंख्येचा आलेख पुन्हा वाढत आहे. गेल्या 35 दिवसांनंतर पहिल्यांदाच रूग्णसंख्या एक हजारहून अधिक झाली. काल दिवसभरात मुंबईत 490 जणांसह राज्यात 1201 कोरोनाबाधित आढळले आहेत. दरम्यान, नाशिकमध्येही कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे नाशिक शहरात आजपासून नो व्हॅक्सिन नो एंट्री नियम लागू करण्यात आला आहे. (Maharashtra: No vaccine, no entry in Nashik city from today)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक शहरात आजपासून नो व्हॅक्सिन नो एंट्री ही मोहीम सुरू होत आहे. तर नाशिक शहरात जागोजागी तपासणी होणार आहे. एसटी, रेल्वे, खासगी वाहतूक सेवा, पर्यटनस्थळे, हॉटेल, रिसॉर्ट, दुकाने, मॉलमध्ये सातत्याने तपासणी होणार आहे. 



तसेच पेट्रोल पंप, बाजार समिती, कार्यालयात केवळ लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळेल. आदेशाचं उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.