नाशिक / येवला / सोलापूर : केंद्र सरकारने कांद्यावरील (Onion) निर्यातबंदी उठवल्याने कांद्याची निर्यातीला (Onion exports) चालना मिळाली आहे. येवला तालुक्यातील अंदरसुल उपबाजार आवारातील एका व्यापाऱ्याने 25 टन कांदा श्रीलंका देशातील कोलंबो येथे निर्यात करण्यासाठी रवाना केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांद्याच्या बाजारभावात दारू घसरण होत असल्याने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एक जानेवारीपासून कांद्याची निर्यात खुली करण्याचे आदेश जारी केले होते. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात सहाशे ते सातशे रुपयांची वाढ झाल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळत आहे.(Onion exports boosted by lifting export ban)


तर आज येवला तालुक्यातील अंदरसूल उपबाजार समितीतील निर्यातदार कांदा व्यापारी अतुल गाडे अँड मर्चंट कंपनीच्यावतीने श्रीलंका देशातील कोलंबो येथे निर्यातीसाठी कांद्याची योग्य प्रतवारी करून 25 टन कांदा कंटेनरमध्ये केला आहे. तामिळनाडू येथील तुटीकुरान बंदरावरून निर्याती होणार असल्याने अंदरसुल येथून रवाना झाला आहे यामुळे कांदा निर्यातीला चालना मिळणार असून विदेशी चलन ही केंद्र सरकारला यातून मिळणार आहे.


सोलापुरातील शेतकऱ्यांना फायदा नाही


सोलापुरात निर्यातबंदी उठवल्याचा अद्याप शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही. जवळपास तीन महिन्यानंतर कांद्यावर लावण्यात आलेली निर्यातबंदी आजपासून उठवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा आता परदेशात पाठवता येणार आहे. मात्र पहिल्या दिवशी सोलापुरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची परिस्थिती जैसे थी पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा निर्यातबंदी उठवल्याचा कोणताही फायदा पहिल्या दिवशी तरी झाला नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 


सोलापुरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 110 गाडी कांद्याची आवक होती. चांगल्या दर्जाच्या कांद्याला जास्तीत जास्त 2800 ते 3000 हजार रुपये इतका दर आहे. सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांकडे कांदा होता, त्यावेळी दर देखील चांगला मिळत होता. मात्र सरकारने निर्यातबंदी लागू केल्याने दर घसरले. आज निर्यातबंदी जरी उठवलेली असली तर शेतकऱ्यांकडे कांदाच नाही. तसेच दर देखील स्थिर असल्याने शेतकऱ्यांमध्ये फारसा आनंद दिसला नाही.