चेतन कोळस, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Onion Traders On Strike In Nashik: नाशिक जिल्ह्यात आजपासून कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहे. शेतकरी हिताच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय कांदा व्यापाऱ्यांनी घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील 15हून अधिक एमपीएससीत 500 हून अधिक व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला आहे. व्यापार्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. 


नाफेड एनसीसीएफमार्फत खरेदी केलेला पाच लाख मॅट्रिक टन कांदा कमी दराने व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी असलेले इतर राज्यातील व्यापाऱ्यांना विक्री करत असल्याने लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. लादलेले शुल्क रद्द करावे, एक टक्का बाजार फी अर्धा टक्का करावी संपूर्ण देशात विक्रेत्याकडून चार टक्के आडत घ्यावी यासह विविध शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी बंद पुकारण्यात आला आहे. 


यापूर्वी व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनावर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा न निघाल्याने आज पासून लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समितीमध्ये कांद्याच्या लिलावाच्या कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने हा बंद पुकारला आहे. व्यापाऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळं अंदाजे 30 ते 40 कोटी रुपयांची दररोजची कांद्याची उलाढाल ठप्प होणार आहे. याचा फायदा देशातील कांदा पुरवठ्यावर होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वच 17 बाजार समितीमध्ये आजपासून कांद्याचे लिलाव बेमुदत काळासाठी बंद राहणार आहेत.


केंद्र सरकारच्या नॅशनल एग्रीकल्चरल कोऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (नाफेड) आणि नॅशनल कोऑपरेटिव कंज्यूमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनसीसीएफ) या दोन संस्था नाशिकच्या शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करुन देशातील विविध एपीएमसी माक्रेटमध्ये विक्री करते. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार  500 ते 700 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री केली जाते. दोन्ही केंद्रीय एजन्सी इतर घाऊक बाजारात उत्पादनाची सरासरी 1,500 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री करत आहेत. दरम्यान, देशातील सर्वात मोठी कांद्याची घाऊक बाजारपेठ असलेल्या लासलगाव एपीएमसी येथे कांद्याचा सरासरी घाऊक भाव प्रतिक्विंटल 2000 रुपये इतका आहे.