चेतन कोळस, झी मीडिया, नाशिक: कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असून केलेला उत्पादन (Onion Cost) खर्च देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे निघणे मुश्किल झाल्याने सरकारने राजकारण सोडून लोकांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते आमदार रोहित पवार (NCP Leader Rohit Pawar) यांनी निफाड तालुक्यातील नैताळे येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उभ्या 2 एकर कांदा पिकावर रोटर फिरवला या ठिकाणी भेट देण्यासाठी आले असताना ते बोलत होते. (maharashtra politcs Ncp leader Rohit Pawar address people say focus more on public issues rather than politics)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निफाड तालुक्यातील नैताळे गावातील सुनील बोरगुडे या शेतकऱ्याने दोन एकर उभ्या कांदा पिकावर रोटर फिरवल्याची माहिती आमदार रोहित पवार यांना मिळताच त्यांनी या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन माहिती घेतली असता यावेळी रोहित पवार म्हणाले की, ''या शेतकऱ्याला जवळपास एकरी 70 ते 80 हजार रुपये कांदा लागवडीसाठी खर्च आला होता कांदा निघण्यास सुरुवात झाली. मात्र कांद्याला दोन, तीन रुपये असा किलोने भाव मिळू लागल्याने या शेतकऱ्याने अक्षरक्ष: या कांदा पिकावर रोटर फिरवत पीक हे नष्ट करून टाकले. 


राजकारणापेक्षा लोकांचे प्रश्न सोडवा...


''उरलेल्या पीक बाजारात नेण्यासाठी त्याला पन्नास हजार रुपये खर्च येणार होता व त्यातून त्याला 20 ते 30 हजार रुपये उत्पन्न मिळणार होते. त्यामुळे वाहतूक खर्च देखील भेटणार नसल्याने या शेतकऱ्याने आपला पीकात शेळ्या सोडत तसेच रोटर मारत पिके नष्ट केले तरी आता सरकारने या कांद्याबाबत लक्ष द्यावे. राजकारण या गोष्टी सोडून नागरिकांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे तसेच येवला तालुक्यातील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने देखील होळीच्या दिवशी कांद्याचा आणि डाग संभारंभ चा कार्यक्रम देखील ठेवला आहे. या सर्व गोष्टीकडे सरकारने आता तरी लक्ष द्यावे व बांग्लादेश व बाहेर हा कांदा पाठवा जेणेकरून शेतकऱ्याला काहीतरी फायदा मिळेल'', अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.


''बांगलादेशला विका अथवा...'' 


नाफेडने कांदा खरेदी करा अथवा बांगलादेशला विका अथवा बाहेर कुठेही विका मात्र शेतकऱ्याला कमीत कमी वीस रुपये दर परवडत असेल तर ते द्यावे नाफेडने कांदा खरेदी करून इथेच विकू नये व बाहेर कुठे विकावा इथेच खरेदी करून इथेच विकला तर येणारा कांद्याला शेतकऱ्याला भाव मिळत नाही. तर सरकारने या गोष्टीत लक्ष घालावे राजकारण या गोष्टी सोडून शेतकऱ्याच्या व लोकांचे प्रश्न सोडवावे असे आमदार रोहित पवार बोलत होते.