गुवाहाटी : Maharashtra Political Crisis : शिवसेनेच नवीन गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रानंतर आता बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी अजय चौधरी यां प्रत्युत्तर दिले आहे. कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय, तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो असं आव्हान त्यांनी दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षादेश हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही, असे शिंदे यांनी ट्वीटद्वारे खडसावले आहे. उलट तुमच्याकडेच संख्याबळ नसताना तुम्ही गट स्थापन केल्यामुळे तुमच्यावरच कारवाईची मागणी आहे, असं शिंदे यांनी म्हटले आहे. 


शिंदे गटाकडून विधानसभा उपाध्यक्षांना पत्र


दरम्यान, राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी. शिवसेना विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे आणि मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची निवड केल्याचे पत्र विधानसभा उपाध्यक्षांना पाठवण्यात आले आहे. शिंदे गटाने 37 आमदारांच्या सहीने हे पत्र पाठवले आहे. 


शिंदे गटाची काल बैठक झाली. त्यात एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली तर भरत गोगावले यांची प्रतोदपदी निवड सर्वानुमते करण्यात आली. या पत्राची प्रत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच विधानपरिषदेच्या सचिवांना पाठवण्यात आली आहे.