Sanjay Raut On MLA disqualification Case: महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षाचा निकाल (Maharashtra political Crisis News) अवघ्या काही तासांमध्ये लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) विरुद्ध उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या कायदेशीर लढाईचा पहिला निकाल आज लागणार आहे. घटनापीठाकडून आज निकालाचं वाचन होणार असून या निकालावर राज्यातील एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार राहणार की जाणार हे ठरणार आहे. हा निकाल लागण्याआधीच या सुनावणीसंदर्भात बुधवारी सुप्रीम कोर्टाच्या निकालांच्या यादीत या प्रकरणाचा समावेश करण्यात आल्यानंतर या संदर्भात राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला आहे. मात्र उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अनोख्या पद्धतीनं शिंदे गटावर निशाणा साधला आहे.


संजय राऊतांची खोचक प्रतिक्रिया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदेंबरोबरच शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र ठरवणारे विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी निकालानंतर आपल्याकडे प्रकरण आलं तर आपण या आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय कायम ठेऊ असं म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी जून आणि जुलै महिन्यामध्ये गुवहाटीत वास्तव्यास असलेले शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या व्हायरल झालेल्या काय झाडी, काय डोंगर या वाक्याचा संदर्भ देत सत्ताधाऱ्यांवर खोटक टीका केली आहे. निकालाची आज सुनावणी असल्याची पोस्ट रिट्वीट करत राऊतांनी त्यावर खोचक पद्धतीने यमक जुळवत प्रतिक्रिया नोंदवली आहे. "काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची नरहरी झिरवळ..." अशी कॅप्शन देत संजय राऊतांनी आजच्या निकालासंदर्भातील पोस्ट शेअर केली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी दोन स्मायलीही वापरले आहेत.  



पाकिस्तानचा उल्लेख करत राऊतांची प्रतिक्रिया...


देश संविधानानुसार चालतो की नाही, देशात लोकशाही आहे की नाही याचा निकाल उद्या सुप्रीम कोर्टात लागणार आहे, असं संजय राऊत यांनी बुधवारी सत्तासंघर्षाच्या निकालाबद्दल बोलताना म्हटलं होतं. देशातील न्यायव्यवस्था कोणाच्या दाबावाखाली काम करत आहे की नाही हे सुद्धा या निकालाने स्पष्ट होईल असंही राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.


नक्की वाचा >> निकालाआधीची मोठी Update! राजभवनाकडे उद्धव ठाकरेंचा राजीनाम्याची प्रतच नाही? RTI उत्तराची प्रत Viral


तसेच पाकिस्तानमधील सत्तासंघर्षाचा संदर्भ देत संजय राऊतांनी, "देशात संविधानानुसार कामकाज चालत नसेल तर तुम्ही पाकिस्तानमध्ये काय सुरु आहे हे पाहू शकता," असं म्हटलं. दरम्यान आजच्या निकालानंतर राज्यातील सरकार राहणार की जाणार हे स्पष्ट होणार असलं तरी काही घटनातज्ज्ञांच्या मते 16 आमदार अपात्र ठरले तरी संख्याबळ पाहता शिंदे सरकारला काहीही धोका नसल्याचं सांगितलं जात आहे.