मुंबई : Maharashtra Political Crisis:  महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर 5 पर्याय समोर येत आहेत. याचा अवलंब करुन राज्याच्या राजकारणातील सत्तेचे गणित बदलू शकते. हे पर्याय असे असतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात राजकीय संकट निर्माण झाले आहे. शिवसेनेचे दिग्गज शिंदे 40 आमदारांसह आसाममधील गुवाहाटी येथे आहेत. त्यांच्या बंडामुळे ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळपर्यंत राजीनामा देण्याची शक्यता आहे. 


महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर पाच पर्याय समोर येत आहेत. याचा अवलंब करुन राज्यातील राजकारणातील पेचप्रसंग संपुष्टात येऊ शकतो.


सरकार स्थापन करण्यासाठी हे  5 पर्याय


एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने भाजप सरकार स्थापन करु शकते.
शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा एक पर्याय आहे.
शिवसेनेने जर एकनाथ शिंदे यांचे मन वळवून सत्ता टिकवणे.
शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करावी आणि बंडखोर आमदारांना पक्षात ठेवून सत्ता कायम टिकविणे.
तसेच विश्वासदर्शक (फ्लोअर टेस्ट) ठरावच्यावेळी महाविकास आघाडीचा पराभव झाला पाहिजे. 


फ्लोअर टेस्ट कशी होईल? 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र फॅक्स करु शकतात. महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा नसलेल्या सुमारे 40 आमदारांचा दावा ते या पत्राद्वारे मांडू शकतात. या पत्राच्या आधारे, राज्यपाल नंतर फ्लोर टेस्टवर निर्णय घेतील, जिथे उद्धव ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल. 


शिंदे-भाजप सरकार कसे स्थापन करणार? 


एकनाथ शिंदे यांनी दोन तृतीयांश संख्या पार करता यावी यासाठी मुंबईत शिवसेनेचे आणखी आमदार जोडण्याचा त्यांचा मानस आहे. हे उद्दिष्ट गाठण्यात शिंदे यांना यश येण्याची शक्यता असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.


सध्या शिंदे यांच्या छावणीत 40 आमदार आहेत. त्याच वेळी भाजप+ कडे 113 आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा असून येथील बहुमताचा आकडा 145 आहे. शिंदे यांच्याबाबत भाजपला 41 आमदारांचा पाठिंबा मिळाल्यास बहुमताचा आकडा 154 च्या पुढे जाईल.