अलिबाग : महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) हा शंभर गोठ्यातील शेण काढून आलेला हा माणूस आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यांनी केली आहे. ते अलिबागमधील (Alibaug) जाहीर सभेत बोलत होते. राज्यात सत्तानाट्य सुरु झाल्यापासून अनेक आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गोटात गेले. यामध्ये  मुरुड-अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार दळवी यांचाही समावेश आहे. या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी आमदार दळवी यांच्यावर जोरदार टीका केली. (maharashtra political crisis shiv sena mp sanjay raut critisize to alibaug mla mahendra dalvi) 


संजय राऊत काय म्हणाले? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"यांचं म्हणे हिंदुत्व धोक्यात आलंय. या दळवीचं कसलं हिंदुत्व आलंय.  हा आला कधी. हा काँग्रेसमध्ये होता, राष्ट्रवादीत होता, शेकापमध्ये होता. त्याच्याआधी कुठे होता माहित नाही. हा  शंभर गोठ्यातील शेण काढून आलेला हा माणूस, याचं कधी हिंदुत्व धोक्यात आलं", असं म्हणत राऊतांनी आमदार दळवींवर जोरदार हल्ला चढवला.


संजय राऊत यांच्या भाषणातील मुद्दे


- दळवीच हिंदुत्व आलं कधी, हा काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादीत होता, शंभर गोठ्यातील शेण काढून आलेला हा माणूस


- बैल बदलण्याची वेळ आली आहे
- राज्यात शिवसेना संपवण्याचं कामसुरु आहे
- शिवसेनेच्या अंगावर येण्याची हिंमत।कराल तर फटके द्यायची वेळ
- बहुमत आहे हिंमत आहे तर।लपून का बसलात
- रस्त्यावर गद्दार फिरता कामा नये
- अब्दुल सत्तारच कोणतं हिंदुत्व धोक्यात आले
- यातील 22 आमदार दुसऱ्या।पक्षातून आले आहेत, बहुतांश राष्ट्रवादीतून आले आहेत


- गोगावले याने कधी।आनंद दिघे यांना कधी पाहिलं, 22 वर्षात दिघे आठवले नाहीत, सेनेच्या नावर माया जमवताना दिघे आठवले आहेत. 
- ईडी ला घाबरणारे सगळे. 
- मुख्यमंत्र्यांनी सांजवेळी घर सोडले तेव्हा साऱ्या देशवासीयांच्या डोळ्यात पाणी. 
- तीन पक्षाच सरकार चालवायचे असेल तर संयमी नेता हवा अशी मागणी मित्र पक्षांनी केली।म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव समोर आले. 


अन्यथा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री 


- अमित शाह यांनी मातोश्रीवर अडीच वर्षे मुख्यमंत्री हा शब्द भाजपाने फिरवला अन्यथा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते
- महाविकास आघाडीतून बाहेर पडू पण हे समोर येऊन सांगा, पण तुमची हिंमत नाही, तुम्हाला बंदिवान करून ठेवलं आहे, तुम्ही हॉटेलमध्ये गुलाम बनवून ठेवले आहे.


- आम्ही शिवसेनेमध्ये आहेत असे म्हणत आहे, शिवसेना आणि बाळासाहेब वेगळे होऊच शकत नाही, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 


आमचं नाव लावू नका


- भुजबळ, नाईक कुठे गेले, गुलाम बनून राहिले. 
- आमचं नाव लावू नका, आम्हाला सोडलं ना
- तुमचे जे काही गट आहेत ते तुमचे, जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना. 
- बाळासाहेब वरून पाहत आहेत, क्लेश देणाऱ्यांना भोगावे लागतील, 50 कोटी टोचतील, एक शिवसैनिक 100 कोटींचा आहे. 
- 56 वर्षात असे शिवसैनिक साधे शाखा प्रमुख झाले नाही तरी ते शिवसेनेत आहे. 
- अम्हीदेखील शिवसेनेमुळे खासदार झालो. 
- या आमदारांनी राजकीय कबर खोदली आहे लोक माती टाकतील. 
- गद्दारांना क्षमा नाही, चुकीला माफी नाही आणि झुकेगे नाही. 
- मला तुरुंगात टाका, फासावर टाका, पण लाखो शिवसैनिक आहेत तव केसाला धक्का लावून देणार नाही. 
- रायगडसुद्धा अश्रू ढासळत असेल. 
- उद्धव ठाकरे यांना सेनापती म्हणून ताकद दिली पाहिजे, परत त्यांना वाजत गाजत वर्षावर न्यायचं आहे. 
- महाराष्ट्र, मुंबई हा जिल्हा आपला.