पाहा Video | राजीनाम्यानंतर रामदास कदम ढसाढसा रडले, म्हणाले...
`राजीनामा देण्याची वेळ ही....` रामदास कदम यांनी बोलून दाखवली मनातली सल, पाहा काय म्हणाले
मुंबई : रामदास शिंदे यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला.राजीनाम्यानंतर रामदास कदम यांनी आपल्या मनातील सल व्यक्त केली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते. त्यांनी आपलं दु:खं व्यक्त केलं. यावेळी त्यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली.
रामदास कदम यांनी नाव न घेता संजय राऊत यांच्यावरही टीका केली. त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना हात जोडून राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडण्याची आवाहनही केलं.
रामदास कदम काय म्हणाले?
''मी 52 वर्ष शिवसेनेसाठी काम केलं. खूप जवळून आणि ग्राऊंड लेव्हलवरून सगळ्या गोष्टी पाहात आलो आहे. मी गेली स्वत: 52 वर्ष झोकून काम केलं.शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा द्यावा लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पक्षाच्या माध्यमातून आमच्या आयुष्याची संध्याकाळ अशी होईल असं वाटलं नव्हतं.
''हे सगळं आम्ही उभं केलं, आज पत्त्यासारखं कोसळतं ते नाही पाहावं मी रात्री झोपूही शकत नाही. मी फार अस्वस्थ आहे मी राजीनामा देऊन आनंदी नाही, मी समाधानी तर त्याहूनही नाही. आजही माझ्यासमोर बाळासाहेब दिसत आहेत.''
आज आमच्यावर ही वेळ का यावी याचा विचार उद्धव ठाकरेंनी केली पाहिजे. उद्धव ठाकरेंनी आमदारांची अडचण समजून विचारण्याऐवजी शिवसेनेतून हकालपट्टीच केली. मला याचं फार दु:ख होतं वाईट वाटतं आणि त्रासही फार होत आहे.''
''मी एकनाथ शिंदेंनाही समजवण्याचा प्रयत्न केला. आमच्यातल्या एकानेच सुरुवात केली कोणाला बैल म्हणतोय शिव्या देतोय त्यामुळे सगळेच चिडले. मी प्रयत्न केला शिवसेना फुटू नये पण मला फार यश आलं नाही. बाळासाहेबांची शिवसेना जगली पाहिजे, मराठी, हिंदुत्व जगलं पाहिजे''
रामदास कदम यांची राजकीय कारकिर्द
रामदास कदम हे सलग चार वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. 2009 मध्ये रामदास कदम यांचा पराभव झाला. 2010 मध्ये शिवसेनेने त्यांना विधानपरिषदेवर पाठवत मोठी संधी दिली. 2005 ते 2009 या काळात ते विरोधी पक्षनेते होते. 2014 मध्ये त्यांना युती सरकारमध्ये पर्यावरण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती.