मुंबई : राज्यातील राजकीय स्थिती सध्या भीषण आहे. शिवसेनेतील काही बंडखोर नेत्यांनी वेगळा गट तयार केला. त्यांनी महाविकास आघाडीविरोधात बंड पुकारलं आहे. एकनाथ शिंदे गटाने हे बंड पुकारलं आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीतील हॉटेलवर आहेत. त्यांचा तिथला मुक्काम 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात या सगळ्या तापलेल्या वातावरणावरून शिवसैनिकांनी समर्थन केलं आहे. राज्यात काही ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी रॅली काढली आहे. 


शिवसेनेचे धुळे महानगरप्रमुख सतीश महाले यांनी दिला राजीनामा दिला आहे. शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ महाले यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे.


पालघरमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात पालघर मधील शिवसेना आक्रमक झाली .आज पुन्हा बंडखोर आमदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पालघर हुतात्मा चौक येथे हे आंदोनल करण्यात आलं असून यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


पुण्यात बालगंधर्व चौकात सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. बंडखोर एकनाथ शिंदे यांना आता शिवसेनेत प्रवेशाचे द्वार बंद केल्यानंतर राज्यात सेना कार्यालयावर लावण्यात आलेले त्यांचे फोटो उद्धव ठाकरे समर्थकांनी काढले आहेत. अकोल्यात आमदार नितीन देशमुख यांच्या कार्यालयावरील बॅनर काढण्यात आले आहेत.


उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आज नाशिक शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आलं. बंडखोर आमदार एकनाथ शिंदे दादा भुसे आणि सुहास कांदे यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येत आहे. 


पुण्यात सेनेच्या शहरभर एकनाथ शिंदे विरोधात आंदोलन सुरू आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 37 आमदारांसह बंड पुकारल्यानंतर राज्यातील शिवसैनिक हे आक्रमक झाले असून बंड आमदारांच्या विरोधात राज्यभर आंदोलन होत आहे. पुण्यातही आज शिवसैनिकांच्यावतीने बंड नेते एकनाथ शिंदे यांच्या फोटोला जोडो मारून आंदोलन करण्यात आल आहे.