Maharashtra Political News : बाळासाहेबांची शिवसेना ( Balasahebanchi Shiv Sena) या पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे पुढे आलेय. कारण मंत्री कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पक्षातील नेत्यांवर आरोप केला आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेनामध्ये चाललंय काय, असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. विरोधी पक्षांसह स्वकियांकडूनही कुरघोड्या होत आहेत. मंत्री सत्तार यांच्या वक्तव्याने शिंदे गटात खळबळ उडाली असून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, जाहीर चर्चा टाळा, असा सल्ला पक्षाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सिल्लोड दौऱ्यावर आहेत. त्यामुळे यावेळी सत्तार यांनी मुख्यमंत्री भेट घेण्याची शक्यता आहे. 


मुख्यमंत्र्यांची चर्चा केल्याचा सत्तार यांचा दावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधी पक्षातील नेत्यांसोबतच आमच्या पक्षातील काही जण कुरघोड्या करत आहेत, असं खळबळजनक वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.  या संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो आहोत, असं सत्तार म्हणाले. त्यामुळे शिंदे गटातही एकमेकांवर कुरघोड्यां सुरु आहेत का या चर्चेला तोंड फुटले आहे. दरम्यान, विरोधकांनी याआधीच आरोप केला होता की, बेकायदा सत्तेत बसलेले सरकार हे त्यांच्याच कर्माने पडेल. त्यांच्यात पुढे पुढे होते काय ते पाहा. त्यामुळे आता शिंदे गटातील अंतर्गत नाराजी पुढे आल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु झालेय.


मुख्यमंत्र्यांच्या संभाजीनगर दौऱ्याला महत्त्व


दरम्यान, शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. अब्दुल सत्तार काही गोष्टी गंमतीत बोलतात त्यामुळे त्या किती गांभीर्याने घ्यायच्या, असं दीपक केसरकर म्हणाले. मात्र अशा गोष्टींची जाहीर चर्चा नको, असा सल्लाही त्यांनी सत्तार यांना दिला आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संभाजीनगर दौऱ्यावर जाणार आहेत. सत्तारांनी स्वकियांकडून कुरघोड्या होत असल्याचं वक्तव्य केल्यावर आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या संभाजीनगर दौऱ्याला महत्त्व आले आहे. मुख्यमंत्री आज दुपारी सत्तारांच्या सिल्लोडलाही भेट देणार आहेत. 


दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरे यांना सल्ला


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आत्मपरिक्षण करावं असा सल्ला दीपक केसरकर यांनी दिलाय. उद्धव ठाकरे आपल्याला बोलले त्याचं वाईट वाटलं नाही, पण एवढे जण पक्ष सोडून जातात तेव्हा नक्की काही तरी घडलेलं असतं, असं केसरकर म्हणाले. घर पेटतं तेव्हा आधी आग विझवावी लागते. त्यामुळे आधी आपलं घर सुरक्षित ठेऊया, असं केसरकर म्हणाले. उद्धवजींबाबत आपल्याला आदर आहे, हे आदरयुक्त प्रेम कायम राहायला हवं, असं ते म्हणाले.