Maharashtra Politics : विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Winter Session) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पहिल्या दिवसापासून आक्रमक झालीय. मविआनं सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) नागपूरच्या एनआयटी (NIT) भूखंडप्रकरणावरुन घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता शिंदे गटातील 4 मंत्र्यांविरोधात मविआनं आघाडी उघडलीय आणि गंभीर आरोप केलेत. शिंदे सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar), उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant), अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) आणि उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाईंवर (Shambhuraj Desai) मविआनं आरोप केले आणि त्यामुळे हे 4 मंत्री अडचणीत आलेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्तारांवर आरोप काय? 


वाशिम मधील 37.19 एकर गायरान जमीनीचा भूखंड अवैधरित्या दिला 


सिल्लोड कृषी महोत्सवासाठी वसुली मोहीम राबवली


राठोडांवर आरोप काय? 


सावरगावच्या इ-क्लास 5 एकर गायरान जमिनीवर अतिक्रमण


गायरान जमिनीवरचं अतिक्रमण नियमित होत नाही


राठोडांकडून जमीन खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश


देसाईंवर आरोप काय?


महाबळेश्वरच्या नावलीत शेत जमिनीवर अवैध बांधकाम


निवडणुकीतल्या शपथपत्रात शेतजमीन म्हणून उल्लेख


सातबाराच्या उता-यावर घराच्या बांधकामाचा उल्लेख नाही


परवानगी न घेता घराचं अवैध बांधकाम केलं


उदय सामंतांवर आरोप काय? 


नगर जिल्ह्यातील मद्य कंपनीला सबसिडी दिली


मद्य कंपनीला मेगा प्रोजेक्टचा दर्जा देण्यासाठी नियम बदलले


कंपनीची 2 जिल्ह्यातील गुंतवणूक एकत्र दाखवली


त्याच मद्यकंपनीला 210 कोटी रुपयांची सबसिडी दिली


दरम्यान मविआच्या आरोपानंतर शिंदे गटही आक्रमक झालाय. मविआचे आरोप शिंदे-फडणवीस सरकारनं (Shinde-Fadanvis Government) फेटाळलेत. भाजप (BJP) विरोधात असताना सत्ताधारी मविआच्या विविध नेत्यांवर आरोप करत राळ उठवण्यात आलेली होती. आता मविआ विरोधात आहे तर तीच खेळी शिंदे सरकारविरोधात खेळली जातेय. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही आरोप
इतकंच काय तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही विरोधकांनी भूखंड वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना नागपूर सुधार प्रन्यास भूखंड वाटपात घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. उमरेड परिसरातील 83 कोटी किंमतीची 2 लाख चौरस फूट जमीन एकनाथ शिंदे यांनी 2 कोटी रुपयात दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयाला तत्कालीन एनआयटी अध्यक्षांनीही विरोध केला होता, नागपूर खंडपीठाने ताशेरे ओढल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तो निर्णय रद्द केला होता.


शिंदे-फडणवीस सरकार पडणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 4 मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करण्यात आल्याने सत्ताधारी याला कसं उत्तर देतात याची उत्सुकता आहेत. त्यातच शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहू शकणार नाही, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बोललं जात आहे. भ्रष्ट मंत्र्यांसोबत सरकार चालवणं भाजपाल शक्य होणार नाही असं, खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.