Ajit Pawar : अजित पवारांचं बारामतीमधलं हे शक्तीप्रदर्शन.. बारामतीत अजित पवारांनी रोड शो केला.. तेव्हा अजित पवारांचे शेकडो समर्थक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना अजित पवारांनी बारामतीत सभा घेतली. या सभेतून अजित पवारांनी बारामतीकरांना साद घातलीय.. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या रॅलीत त्यांचे चिरंजीव जय पवारही सहभागी झाले होते.. रॅलीच्या माध्यमातून जय पवारांनी बारामतीत शक्तीप्रदर्शन केलं.. बारामतीची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जय पवारांचं नाव चर्चेत आहे.. तेव्हा विधानसभेसाठी संधी मिळाल्यास नक्की उभा राहणार असं विधानही जय पवारांनी केलंय.


अजित पवारांच्या रॅलीत सर्वांचं लक्ष दादांच्या पोस्टरकडे वेधलं जात होतं.. अजित पवारांच यंदाचे मुख्यमंत्री असे पोस्टर्स बारामतीत लावण्यात आले होते. दादांना मुख्यमंत्री बनवायचं ही सर्वांचीच इच्छा आहे असं म्हणत जय पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे पत्तेही खुले केले आहेत.


महायुतीचा मुख्यमंत्री कोण असा सवाल अजित पवारांना याआधी विचारण्यात आला होता. निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री ठरवणार असं उत्तर दादांनी तेव्हा दिलं होतं. मात्र आता अजित पवारांचेच भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लागलेत. त्यामुळे येत्या विधानसभेत अजितदादा जागापाटपात मोठा वाटा मागणार का? ज्याच्या जागा सर्वाधिक त्यांचा मुख्यमंत्री हा महायुतीचा फॉर्म्युला असणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.


ऐकीकडे रामराजे नाईक निंबाळकरांनी काल तुतारी हाती घेण्याचा इशारा दिलाय.. तर दुसरीकडे आज फलटण मधील कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर आणि अजित पवार एकाच मंचावर आलेत.. त्यामुळे राजकीय वर्तूळात चर्चा वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात..