Uddhav Thackeray vs Eknath Shinde : `एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन काढण्याचा निर्णय पक्षाचा होता`
Uddhav Thackeray vs Eknath Shinde : सत्तासंघर्ष सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी घमासान युक्तिवाद सुरु आहे. (Maharashtra Politics) शिवसेनेचे नेते, उपनेते, व्हीप निवडण्याचे काही नियम आहेत का?, असा सवाल सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला विचारला आहे. ठाकरे गटाकडून दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. (Maharashtra Political News)
Uddhav Thackeray vs Eknath Shinde : सत्तासंघर्ष सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी घमासान युक्तिवाद सुरु आहे. (Maharashtra Politics) शिवसेनेचे नेते, उपनेते, व्हीप निवडण्याचे काही नियम आहेत का?, असा सवाल सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला (Shiv Sena) विचारला आहे. तर एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन काढण्याचा निर्णय पक्षाचा होता. त्यांना पदावरुन दूर केल्यानंतर अजय चौधरी यांची नियुक्ती केली. (Maharashtra Politics case ) विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirval) यांनी त्याला मान्यता दिली. पक्षाशी समन्वय राखत विधिमंडळाचं कामकाज चालवण्याचा अधिकार प्रतोद यांना आहे, असा ठाकरे गटाकडून दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करण्यात आला. (Maharashtra Political News)
कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तीवाद...
राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात दुस-या दिवशी सुनावणी सुरु झाली आहे. जानेवारी 2023 पर्यंत उद्धव ठाकरे पक्ष प्रमुख होते. यावेळी सुप्रीम कोर्टाने शिवसेनेचे नेते कसे निवडले जातात, असा सवाल केला. यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करताना सांगितले की, काही निवडणूकीतून आणि काही नियुक्तीमधूननेते आणि उपनेते मिळून शिवसेना पक्ष प्रमुख निवडतात. दरम्यान, निवडणूक आयोग म्हणतेय की पक्षाची संहिता नाही. जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले ते कोणत्याही सभागृहांचे सदस्य नव्हते. तर गटनेते एकनाथ शिंदे आणि प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती केली.
31ऑक्टोबरला निवडणुकीनंतर निवडून आलेल्या आमदारांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांना गटप्रमुख पदी आणि सुनील प्रभू यांची चीफ व्हीपपदी निवड करण्यात आली, असा युक्तिवाद करताना सिब्बल यांना सरन्यायाधीशांनी विचारले, गटनेते नेमण्याचा अधिकार आणि प्रतोद नेमण्याचा अधिकार कोणाचा आहे या संदर्भात काही नियम आहे का? यावेळी ठाकरे गटाचे वकील सिब्बल म्हणालेत नाही, पण अशाच प्रकारे सर्व पक्षात नियुक्ती होती.
हे राजकारण आहे...
प्रतोदची कार्यासंदर्भात कोणती?, असे कोर्टाने विचारल्यानंतर या विषयी कपिल सिब्बल माहिती दिली की, एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन काढण्याचा निर्णय पक्षाचा होता. त्यांना पदावरुन दूर केल्यानंतर अजय चौधरी यांची नियुक्ती केली. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्याला मान्यता दिली. पक्षाशी समन्वय राखत विधिमंडळाचं कामकाज चालवण्याचा अधिकार प्रतोद यांना आहे. हे सगळं हे राजकारण आहे. निवडणुकीपूर्वीची युती काही महत्त्वाची नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी महत्त्वाचा नव्हता. हे राजकारण आहे. गुवाहाटीला जाण्यापर्यंत यांनी कोणताही पक्षाच्या विरोधात वक्तव्य केलेले नाही.हे सगळं घडवून आणलेलं आहे, असा जोरदार युक्तीवाद सिब्बल यांनी केला.