CM Eknath Shinde : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आता ठाकरे गटाला (Thackeray Group) पुण्यात ( Pune News) आणखी एक दणका देणार आहेत. ( Maharashtra Political News in Marathi ) पुणे पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: मैदानात येणार उतरणार आहेत. 20 तारखेला मुख्यमंत्री आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. ठाकरे गटातल्या नाराजांना हेरण्याची शिंदे यांची व्यूहरचना आहे.  (Maharashtra Politics)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत सध्या चांगलीच चुरस आहे. कारण राष्ट्रवादीकडून खुद्द शरद पवारही मैदानात उतरलेत.. तेव्हा संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी कसबा, चिंचवडच्या लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वत: उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शिवसेना नाव आणि चिन्हाचा निर्णय काल निवडणूक आयोगाने दिल्यावर आता मुंबईत आणि महाराष्ट्रात शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला आहे. लोकशाहीची हत्या असा मजकूर असलेले पोस्टर्स शाखांबाहेर झळकले आहेत. 


 ठाकरेंना आणखी धक्का बसणार ?


शिवसेना नाव आणि पक्ष चिन्ह निसटल्यानंतर ठाकरेंना आणखी धक्का बसणार आहे... ठाकरे गटातला आणखी एक खासदार शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर येतेय. विशेष म्हणजे या खासदाराने शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याच्या माहितीनं खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगासमोर सादर झालेल्या कागदपत्रांमधून हा धक्कादायक खुलासा समोर आलाय.


या खासदाराने प्रतिज्ञापत्र देऊन आपण शिंदे गटात असल्याचं सांगितल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. शिंदे गटात सहभागी झालेले गजानन किर्तीकर हे तेरावे खासदार आहेत. ठाकरे गटाकडे त्यानंतर फक्त पाचच खासदार उरलेत. तेव्हा शिंदे गटात येणारा ठाकरे गटाचा तो खासदार कोण याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत.


 मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता


अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शिंदेंना धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा विचार सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...अमित शहा उद्या कोल्हापुरात बैठक घेणार आहेत. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.