Udaya Samat : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्ष फुटली आहे. एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या 40 आमदारांपैकी एक असलेले उदय सामंत उद्योग मंत्री आहेत. यामुळे  उदय सामंत शिंदे गट सोडून कुठे जार नसले तरी आता त्यांच्या घरातच फुट पड पडली आहे. उदय सामंत  यांचे भाऊ किरण सामंत हे ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 


किरण सामंत यांनी आपला व्हॉट्सअप डीपी मशाल ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्योग मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांनी आपला व्हॉट्सअप डीपी मशाल ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.  किरण सामंत यांनी फक्त आपला व्हॉट्सअप डीपीच बदलला नाही तर 'जो होगा वो देखा जायेगा' असा स्टेटस ठेवलeा आहे. यामुळे किरण सामंत ठाकरे गटात जाणार का...? अशा चर्चा रंगू लागल्या आहे.


निवडणूक लढायची असेल तर भाजपात या - नितेश राणे यांचे आवाहन


सामंतांना निवडणूक लढायची असेल तर भाजपात यावं आणि कमळ चिन्हावर लढावं असं विधान नितेश राणे यांनी केले आहे. 


रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा जागेसाठी  उदय सामंत भावासाठी  प्रयत्नशील


रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सूचक विधान केलंय. एकीकडे भाजप या मतदारसंघासाठी तयारी करत आहे.  त्यातच लांजा इथे कार्यकर्ता मेळाव्यात उदय सामंत यांनी केलेल्या विधानामुळे या जागेवरून युतीत रस्सीखेच होणार अशी शक्यता वर्तवली जातेय. आपलं शासकीय निवासस्थान मुंबईत ओआहे. मात्र आता दिल्लीतही आपलं निवासस्थान असलं पाहीजे असं सामंत यांनी म्हटलंय. उदय सामंत या जागेसाठी आपले मोठे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांच्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं जातंय. 


येत्या 15 दिवसांत शरद पवारांचा सहभाग असणारे मजबूत सरकार राज्यात आणि केंद्रात दिसेल - रवी राणांचा दावा


येत्या 15 ते 20 दिवसांत राज्यात चमत्कार घडेल...आणि शरद पवारांचा सहभाग असणारे मजबूत सरकार राज्यात आणि केंद्रात दिसेल असा खळबळजनक दावा आमदार रवी राणांनी केलाय...रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील आमदार मानले जातात...त्यामुळे रवी राणांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय...तर राणांचा हा दावा राष्ट्रवादीच्या पवार गटानं फेटाळून लावलाय.