Maharashtra Government Formation:  मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा भव्य शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला पार पडला. मात्र आता लक्ष लागलंय कुणाली किती मंत्रिपदं मिळणार याकडे. सत्तास्थापनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट आल्याचे दिसत आहे. सत्तानाट्यानंतर खातेवाटप नाट्य सुरु झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रालय मिळावे यासाठी आग्रही आहेत. मात्र, गृहमंत्रालयाच्या बदल्यात एकनाथ शिंदेंपुढे 3 पर्याय देण्यात आल्याचे समजते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृहमंत्रालयाच्या बदल्यात  महसूल, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम खाते असे 3 पर्याय  शिवसेनेपुढे ठेवण्यात आले आहेत.  शिवसेनेकडून यातल्या एका खात्यावर विचार सुरू आहे. गृहखात्याइतकेच महत्वाचे, तोडीसतोड खाते मिळवण्याकरता शिवसेना आग्रही असल्याचे समजते. 


दरम्यान, शिवसेनेच्या 13 नेत्यांना मंत्रिपदं मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडून 6 नवे चेहरे दिले जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.  शिवसेनेचे 13 जण मंत्रिपदाच्या शर्यतीत असून अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


'हे' आहेत शिवसेनेचे संभाव्य मंत्री


एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)
गुलाबराव पाटील
दादा भुसे
उदय सामंत
तानाजी सामंत
दीपक केसरकर
शंभुराज देसाई
भरत गोगावले
अर्जुन खोतकर
संजय शिरसाट
योगेश कदम
बालाजी किणीकर 
प्रकाश सुर्वे 
मंगेश कुडाळकर