Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने (Mahayuti) मोर्चेबांधणी सुरू केलीय. महायुतीच्या नेत्यांच्या आता विभागवार बैठका सुरू झाल्या आहे. प्रत्येक विभागातील महायुतीचे तीन प्रमुख पक्ष आणि इतर घटक पक्ष यांच्या नेत्यांची आढावा बैठका दोन ते तीन टप्यात झाल्या आहेत. आता चौथ्या टप्यात मतदारसंघाचे जागावाटप विभागवार पद्धतीने सुरू करण्यात येत आहे. महायुती मधील जो उमेदवार ज्या विधानसभा मतदारसंघातून (Assembly Election 2024) निवडुण येऊ शकतो, अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलं आहे. यामध्ये महायुतीमधील विद्यमान आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांचाही आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितल्याप्रमाणे उमेदवारांचे जिंकून येण्याचं मेरीट पाहूनच तो विधान सभा मतदारसंघ आणि उमेदवार कोणत्या पक्षाला आणि कोणत्या उमेदवारांना दिला जाणार याचा निर्णय घेतला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेसाठी महायुतीची मोर्चेबांधणी
विधानसभा निवडणुकीची तयारी महायुती कडून सुरू करण्यात आलीय  अनेक बैठका यासाठी होत आहेत ,या बैठकीचा आढावा रिपोर्ट तयार होणार आहे. तसेच विभागवार नेत्यानी तयार केलेल्या अहवालावर राज्यातील सर्वोच्च नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत अंतीम यादी ठरवली जाणार आहे. कोकण विभागाच्या पार पडलेल्या बैठकीत 15 विधानसभा मतदारसंघांचे महायुतीच्या तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटप करण्यात आल्याची माहीती झी मीडियाला वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. 


कोकणविभागातील 15 जागांचं वाटप
विधान सभा निवडणुकीसाठी महायुतीचे कोकणातील संभाव्य जागावाटप पुढील प्रमाणे
1) अलिबाग- शिवसेना
2) पनवेल- भाजप
3) कर्जत- शिवसेना
4) उरण- भाजप
5) पेण- भाजप
6) श्रीवर्धन- राष्ट्रवादी अजित पवार गट
7) महाड- शिवसेना
8) दापोली- शिवसेना
9) चिपळुण-  राष्ट्रवादी अजित पवार गट
10) गुहागर- भाजप
11) रत्नागिरी- शिवसेना
12) राजापूर- शिवसेना
13) कणकवली- भाजप
14) मालवण- शिवसेना
15) सावंतवाडी- शिवसेना


अजित पवारांचं महत्त्वाचं विधान
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतील जागावाटपाबाबत महत्त्वाचं विधान केलंय. जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली असून विद्यमान आमदार असलेल्या जागेवर त्याच पक्षाचा दावा असल्याचं अजितदादांनी म्हटलंय. तर जागावाटपावर वरिष्ठ निर्णय घेतील असं मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी म्हटलंय.  तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत बसून चर्चा करू, जिथे कुठे महायुतीतील मित्र पक्षांचे उमेदवार असतील, तिथे भाजपचा उमेदवार बंडखोरी करणार नाही असं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.