Sambhaji Nagar News : आठ-नऊ एकर शेती, घरचं चांगलं पण...ठाकरे गटाच्या आमदाराला तरुण शेतकऱ्यांचा फोन
Maharashtra Political News : एकीकडे महाराष्ट्रात सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) महासुनावणी सुरु आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या गटासाठी अग्निपरीक्षा आहे. अशातच शिवसेना आमदारासमोर वेगळं संकट उभं ठाकलंय.
Farmer Called MLA for Marriage : लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर क्षण असतात. आपलं लग्न (Marriage news) व्हावं हे प्रत्येक तरुणांना वाटतं. पण कोणाच ठाऊक शेतकरी (farmer news) तरुणांना मुली मिळणं कठीण झालं आहे. एकीकडे महाराष्ट्रात सत्तासंघर्षाची महासुनावणी (Maharashtra Political Crisis Hearing) सुरु आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या गटासाठी अग्निपरीक्षा आहे. अशातच शिवसेना आमदारासमोर वेगळं संकट उभं ठाकलंय. गडगंज श्रीमंती असूनही शेतकरी तरुणाला जीवनाचा साथीदार मिळतं नाही आहे. या पठ्ठाने आपली व्यथा थेट आमदारसाहेबांकडे मांडली आहे.
आठ-नऊ एकर शेती, घरचं चांगलं पण...
शेतकऱ्यांच्या (maharashtra news) लग्नाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होतं चालला आहे. असाच एक लग्न वेडा तरुणाला आमदारांचं दारात आपली समस्या मांडवावी लागली आहे. बी. एस्स्सीपर्यंत शिक्षण, घरं सर्व चांगलं, आठ एकर शेती म्हणजे अगदी गडगंज श्रीमंती असं असूनही त्या तरुणाला लग्नासाठी मुलगी मिळतं नाही. या तरुणाने अखेर शहरातील ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत (udaysingh rajput) यांना आपलं म्हणं मांडलं. एवढंच नाही तर या तरुणाने तुमच्या सर्कलमध्ये लग्नासाठी मुलगी असेल तर पाहा अशी विनंतीही केली आहे. (maharashtra politics news Sambhaji Nagar News Farmer Called uddhav thackeray shiv sena MLA for Marriage marathi news)
आमदाराला तरुण शेतकऱ्यांच्या लग्नाचं टेन्शन
हा तरुण संभाजीनगरमधील खुल्ताबाद तालुक्यातील आहे. आमदारसाहेबांनी तरुणाला नाराज न करता, त्याला बायोडाटा पाठवून दे, बघतो असं आश्वासन त्यांनी तरुणाला दिलं. सध्या या संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे आमदारसाहेबांना सोयरीक घडवून आणण्यात रस आहे. त्यांनी आतापर्यंत 60 ते 70 तरुण शेतकऱ्यांचं लग्न जुळलं आहे. त्यामुळे या तरुणाला आपलं लवकरच लग्न होईल अशी आशा आहे.