Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांची महायुती असल्याने यामध्ये जागावाटप कसे होणार असा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान महायुतीचे जागावाटप समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप, एकनाथ शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी असे 3  गट एकत्र आल्याने जागावाटपात मोठी चढाओढ होणार हे निश्चित मानले जात होते. दरम्यान शिवसेना-भाजप युतीत मागून आलेल्या अजित पवार गटाला किती मिळणार? याबद्दलही उलटसुलट चर्चा सुरु होती. या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. 


राज्यात लोकसभेसाठी महायुतीचं जागावाटप जवळपास निश्चीत झाले आहे. भाजप 26, तर शिंदेगट आणि अजित पवार गट 22 जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी ही माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. 


येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप 26, तर शिंदे गट 22 आणि अजित पवार गट 22 जागा लढवताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या तिन्ही पक्षांकडून याबद्दल अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाऊ शकते.