Sharad Pawar : शरद पवार तीन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.. त्यामुळे पवार कोल्हापुरात कोणते डाव टाकणार याचीच चर्चा सुरू झालीय. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर हसन मुश्रीफ अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे पवारांच्या पक्षात सध्या मोठा नेता नाही.. मात्र कोल्हापूर दौऱ्याआधीच पवारांनी भाजपला धक्का देत फडणवीस यांचे निकटवर्तीय समरजीत घाटगेंना आपल्या पक्षात आणलं.. घाटगे यांचा 3 ऑगस्टला पवारांच्या उपस्थितीत अधिकृत पक्षप्रवेश होणाराय...  त्यामुळे पवारांच्या निशाण्यावर विरोधकांचा दुसरा कोणता मोहरा आहे का? याची जिल्ह्यात चर्चा सुरू झालीय..  त्यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापूरातून एक सुटक वक्तव्य केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापुरातील सर्वच दिग्गज नेत्यांना पवारांनी आतापर्यंत अंगावर घेतलंय.  2004 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेत असलेल्या धनंजय महाडिक यांना उद्देशुन कौन है ये मुन्ना असा पवारांनी भाषणात उल्लेख केला होता.. त्यानंतर निवडणुकीचं वारं फिरलं होतं. आणि राष्ट्रवादीचे सदाशीवराव मंडलिक विजयी झाले होते. 2009 ला सदाशिवराव मंडलिक यांचा तिकीट कापत त्यांच्या विरोधात पवारांनी संभाजीराजे छत्रपतींना मैदानात उतरवलं होतं. तर 2019 मध्ये सतेज पाटलांनी आघाडी धर्म सोडून आमचं ठरलंय म्हणत युतीच्या उमेदवाराला मदत केली होती.. सतेज पाटलांच्या तुमचं ठरलंय ला पवारांनी आम्ही बी ध्यानात ठेवलंय म्हणत सतेज पाटलांना इशारा दिला होता. 


शरद पवारांचं 'मिशन कोल्हापूर'


- 2004 - कौन है ये मुन्ना? म्हणत धनंजय महाडिकांवर निशाणा
- 2009 - सदाशिवराव मंडलिकांचं तिकीट कापत पवारांकडून धक्का
- 2019 - सतेज पाटलांच्या 'आमच ठरलंय'ला 'आम्ही बी ध्यानात ठेवलंय म्हणत पवारांचा इशारा   


शरद पवारांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या जवळपास सर्वच नेत्यांना आत्तापर्यत अंगावर घेतलंय. याला हसन मुश्रीफ हे अपवाद होते... पण  आत्ता विधानसभा  निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार  कशा प्रकारे  हसन मुश्रीफ याचा समाचार घेवून  त्यांना चितपट करण्याचा प्रयत्न करतात हे पाहणं  औसुक्याचे ठरणाराय.