Maharashtra Politics : वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पक्षाचे अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले आहे. अनेकांनी शरद पवार यांची सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार गटात प्रवेश केला. मात्र आता अनेकांनी पुन्हा एकदा शरद पवार गटाची वाट धरली आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके पुन्हा एकदा घरवापसी करणार असल्याचे म्हटलं जातंय. निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता शरद पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी अहमदनगरच्या पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाबाबत भाष्य केलं. याआधी खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना महाविकास आघाडीत येऊन तुतारी घेऊन लोकसभा निवडणूक लढण्याच निमंत्रण दिल होतं. त्यानंतर निलेश लंके शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र शरद पवार यांनी अशा चर्चेला काही अर्थ नाही असे म्हणत निलेश लंकेच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब करणं टाळलं


काय म्हणाले शरद पवार?


"चर्चेला काही अर्थ नाही. एकदम अशी चर्चा का झाली. असे अनेक लोक आहेत. ही चर्चा मी तुमच्याकडून ऐकत आहे. किती संपर्कात आहे याबद्दल माहिती नाही कारण आम्ही त्या उद्योगात नाही. अनेक लोक असे आहेत की, ज्यांना हे योग्य वाटत नाही. त्यांनी आमच्यापासून दूर जाण्याचे निर्णय घेतले आहेत आणि त्यांच्या निर्णयावरुन ते ठाम आहेत. पण ते अस्वस्थ आहेत. कोण येणार आहे त्याची माहिती द्या, माझ्या समोर उभं करा," असं शरद पवार म्हणाले.


रोहित पवारांवरील कारवाईवर केलं भाष्य


"महाराष्ट्रामध्ये ईडीचा गैरवापर करण्याचे काम सुरु असल्याचे दिसत आहे. यापूर्वी अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केली गेली. तसेच संजय राऊत यांच्यावरही कारवाई केली गेली. पण त्यांना जामीन मिळाला. एक प्रकारची दहशत निर्माण करण्याची पावले आहेत. रोहित पवार यांना बोलवलं गेलं आणि त्यांच्या संस्थेवर जप्ती करण्यात आली. ईडीच्या कारवाईचा परिणाम निवडणुकीवर करायचा दिशेने पाऊले टाकली जात असल्याचे दिसत आहे," असे शरद पवार यांनी म्हटलं.